बहिणीसोबत बरे-वाईट करण्याची धमकी देत मुलावर अनैसर्गिक अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2022 22:14 IST2022-06-24T22:13:25+5:302022-06-24T22:14:01+5:30
Nagpur News बहिणीसोबत बरे-वाईट करण्याची धमकी देत एका १९ वर्षीय मुलावर शारीरिक अत्याचार करण्यात आल्याची घटना भोईपुरा परिसरात घडली. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ माजली आहे.

बहिणीसोबत बरे-वाईट करण्याची धमकी देत मुलावर अनैसर्गिक अत्याचार
नागपूर : बहिणीसोबत बरे-वाईट करण्याची धमकी देत एका १९ वर्षीय मुलावर शारीरिक अत्याचार करण्यात आल्याची घटना भोईपुरा परिसरात घडली. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ माजली आहे.
पीडित मुलगा गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतो. २१ जून रोजी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास संबंधित मुलगा रस्त्याने जात असताना कुंभारपुरा, बजेरिया येथील मुकेश उर्फ मुक्कू नियाय (२२) व संतोष गौर (२०) या दोघांनी त्याला अडविले. ते त्याला भोईपुरा येथील मोकळ्या जागेत घेऊन गेले. आमचे ऐकले नाहीस तर तुझ्या बहिणीसोबत आम्ही वाईट काम करू, अशी त्याला धमकी दिली व मुकेशने त्या मुलासोबत अनैसर्गिक संभोग केला. यावेळी संतोषने व्हिडिओ बनविला व तो व्हायरलदेखील केला. यामुळे संबंधित मुलाला प्रचंड धक्का बसला. त्याने अखेर गणेशपेठ पोलीस ठाणे गाठले व तक्रार दाखल केली. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा नोंदविला आहे.