वाहनाच्या धडकेत अनाेळखी व्यक्तीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:08 IST2021-03-19T04:08:56+5:302021-03-19T04:08:56+5:30

बुटीबाेरी : अज्ञात भरधाव वाहनाने धडक दिल्याने अनाेळखी व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना बुटीबाेरी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील बाेथली परिसरात ...

Unknown person killed in vehicle collision | वाहनाच्या धडकेत अनाेळखी व्यक्तीचा मृत्यू

वाहनाच्या धडकेत अनाेळखी व्यक्तीचा मृत्यू

बुटीबाेरी : अज्ञात भरधाव वाहनाने धडक दिल्याने अनाेळखी व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना बुटीबाेरी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील बाेथली परिसरात मंगळवारी (दि.१६) रात्री १० वाजताच्या सुमारास घडली.

मृत अनाेळखी व्यक्ती हा मानसिक रुग्ण असून, ताे परिसरात फिरत हाेता. मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास फिर्यादी सेक्युरिटी गार्ड प्राण प्रेमलाल पटले (४९, रा. वाघधरा, ता. हिंगणा) हे डिव्हाईड हाॅटेल येथे ड्युटीवर असताना हाॅटेलसमाेर अपघाताचा आवाज आला. लागलीच पटले यांनी धाव घेत पाहिले असता, अज्ञात वाहनाच्या धडकेत अनाेळखी व्यक्ती मृतावस्थेत आढळून आला. याबाबत त्यांनी बुटीबाेरी पाेलिसांना सूचना दिली. याप्रकरणी बुटीबाेरी पाेलिसांनी भादंवि कलम २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नाेंदविला असून, घटनेचा तपास पाेलीस हवालदार असलम नाैरंगाबादे करीत आहेत.

Web Title: Unknown person killed in vehicle collision