विद्यापीठाची २२ जानेवारीची परीक्षा २८ जानेवारीला

By आनंद डेकाटे | Updated: January 20, 2024 19:37 IST2024-01-20T19:36:10+5:302024-01-20T19:37:32+5:30

आता रविवारी २८ जानेवारी रोजी पूर्वीच्या वेळेनुसार आणि प्रवेशपत्रावरील असलेल्या लेखी परीक्षा केंद्रावर होणार आहे.

University exam on 22nd January on 28th January | विद्यापीठाची २२ जानेवारीची परीक्षा २८ जानेवारीला

विद्यापीठाची २२ जानेवारीची परीक्षा २८ जानेवारीला

नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या हिवाळी परीक्षेतील सोमवारी २२ जानेवारी रोजीच्या सर्व लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. २२ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आल्याने या परीक्षा आता रविवारी २८ जानेवारी रोजी पूर्वीच्या वेळेनुसार आणि प्रवेशपत्रावरील असलेल्या लेखी परीक्षा केंद्रावर होणार आहे. याची संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी, केंद्रप्रमुखांनी व विद्यार्थ्यांनी नोंद घेण्याचे आवाहन विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी केले आहे. 

Web Title: University exam on 22nd January on 28th January