केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा 60 वा वाढदिवस
By Admin | Updated: May 27, 2017 14:08 IST2017-05-27T09:06:53+5:302017-05-27T14:08:23+5:30
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी आज वयाची 60 वर्ष पूर्ण करत आहेत. देशात आपला ठसा उमटवणा-या गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देश त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा 60 वा वाढदिवस
गडकरी यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त शनिवारी कस्तूरचंद पार्क येथे सायंकाळी 5.30 वाजता त्यांच्या षष्ट्यब्दीपूर्ती सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा असणार आहेत. तर आध्यात्मिक संत श्री श्री रविशंकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, काँग्रेस नेते माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, शिवसेनेचे नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह देशभरातील सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार आहेत. देशभरातील आमदार, खासदार व विविध क्षेत्रातील मान्यवर गडकरींना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहतील.
या सोहळ्याच्या आयोजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नितीन गडकरी षष्ट्यब्दीपूर्ती गौरव समारोह समिती स्थापन करण्यात आली आहे. ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे समितीचे संयोजक असून वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी हे सहसंयोजक आहेत.