केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आज 'लोकमत नॅशनल मीडिया कॉनक्लेव्ह'साठी नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2023 09:41 IST2023-04-02T09:40:07+5:302023-04-02T09:41:40+5:30

लोकमत मीडिया ग्रुपचे चेअरमन, माजी राज्यसभा सदस्य डॉ. विजय दर्डा परिषदेच्या अध्यक्षस्थानी

Union Minister Anurag Singh Thakur in Nagpur today for Lokmat national media conclave | केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आज 'लोकमत नॅशनल मीडिया कॉनक्लेव्ह'साठी नागपुरात

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आज 'लोकमत नॅशनल मीडिया कॉनक्लेव्ह'साठी नागपुरात

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग सिंह ठाकूर रविवारी (दि. २) नागपुरात येत आहेत. ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी व लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा यांची जन्मशताब्दी तथा लोकमत नागपूरच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त "भारतीय माध्यमांचे पूर्णपणे ध्रुवीकरण झाले आहे कार या विषयावर रामदासपेठेतील हॉटेल सेंटर पॉइंटमध्ये दुपारी २.३० वाजता 'लोकमत नॅशनल मीडिया कॉन्क्लेव्ह' आयोजित करण्यात आली आहे. ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असलेल्या या मीडिया कॉन्क्लेव्हचे उद्घाटन राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार करतील.

लोकमत मीडिया ग्रुपचे चेअरमन व माजी राज्यसभा सदस्य डॉ. विजय दर्डा परिषदेच्या अध्यक्षस्थानी राहतील. दोन सत्रात ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. यात ख्यातनाम पत्रकार मते मांडतील. विदर्भातील तीनशेहून अधिक पत्रकार या परिषदेत सहभागी होतील. याशिवाय 'लोकमत'च्या वाटचालीचा इतिहास मांडणाऱ्या देखण्या चित्रकृतीचे अनावरण रविवारी सायंकाळी ७ वाजता ठाकूर यांच्या हस्ते लोकमत भवनात होणार आहे.

Web Title: Union Minister Anurag Singh Thakur in Nagpur today for Lokmat national media conclave