शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
2
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
3
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
5
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
6
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
7
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
9
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
10
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
11
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
12
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
13
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
14
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
15
आता पहिलीपासूनच शिका शेती; शालेय अभ्यासक्रमात टप्प्याटप्प्याने कृषी विषयाचा समावेश
16
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
17
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
18
चिंताजनक ‘लडाख फाइल्स’! सोनम वांगचुक यांना देशद्रोही ठरवून तुरुंगात सडविणे दिसते तितके सोपे नाही
19
ट्रम्प, जिमी किमेल आणि गुदगुल्यांचा ‘खंजीर’! ही एकी जगभरातील माध्यमांसाठी एक संदेशच...

केंद्रीय गृहमंत्री व संरक्षणमंत्री २ जानेवारीला नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 21:11 IST

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे येत्या २ जानेवारी रोजी नागपूर दौऱ्यावर येत आहेत. अमित शहा यांच्या हस्ते नॅशनल फायर सर्व्हीस कॉलेजच्या इमारतीचे लोकार्पण करण्यात येईल.

ठळक मुद्देफायर सर्व्हिस कॉलेजचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे येत्या २ जानेवारी रोजी नागपूर दौऱ्यावर येत आहेत. अमित शहा यांच्या हस्ते नॅशनल फायर सर्व्हीस कॉलेजच्या इमारतीचे लोकार्पण करण्यात येईल. यासोबतच एनडीआरएफ अकादमीचे भूमीपूजनही त्यांच्या हस्ते होईल. फायर सर्व्हीस क्षेत्रातील गॅलेंट्री अवॉर्डचे वितरण सुद्धा त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तर सदर येथील उड्डाणपुलाचे लोकार्पण राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे २ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होईल. यानंतर ते थेट कार्यक्रम स्थळी पोहोचतील. या कार्यक्रमादरम्यान गृहमंत्री शहा नव्या राष्ट्रीय फायर सर्व्हीस कॉलेज कॅम्पस राष्ट्राला समर्पीत करतील. यासोबतच त्यांच्या हस्ते राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल (एनडीआरएफ) अकादमीचेही उद्घाटन करतील. या कार्यक्रमादरम्यान गृहमंत्री शहा यांच्या हस्ते प्रेसिडेंट्स फायर सर्व्हीस मेडलचेही वितरण केले जाईल. यावेळी गृहमंत्री हे नॅशनल फायर सर्व्हीस कॉलेजच्या प्रयोगशाळेलाही भेट देतील. एनडीआरएफ अकादमी व डीआरडीओच्या मॉडेलचे प्रदर्शन यावेळी केले जाईल.राजनाथ सिंह यांच्या हस्ते सदर उड्डाणपुलाचे लोकार्पणसदर येथील उड्डाणपुलाचे कार्य पूर्ण झाले असून २ जानेवारीला केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते पुलाचे लोकार्पण करण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर संदीप जोशी यांनी दिली. पश्चिम, उत्तर, मध्य नागपूरला जोडणारा हा महत्त्वाचा उड्डाणपुल आहे. या पुलाची एकूण लांबी ३.८ किमी असून हा पूल संविधान चौक ते जुना काटोल नाका, मानकापूरपर्यंत जोडला गेला आहे. या पुलासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला असून निर्धारित कालावधीच्या आत हा पूल तयार झाला आहे.२ जानेवारीला केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते पुलाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र्र फडणवीस, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री डॉ.नितीन राऊत, खासदार विकास महात्मे, आ. विकास ठाकरे, आ. विकास कुंभारे, आ. कृष्णा खोपडे, आ.मोहन मते प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. दरम्यान महापौर संदीप जोशी यांनी शुक्रवारी सदर उड्डाणपुलाची पाहणी केली.

टॅग्स :Amit Shahअमित शहाRajnath Singhराजनाथ सिंहnagpurनागपूर