शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह घेणार विदर्भातील जागांचा आढावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 10:56 IST

कोअर कमिटीसोबत संवाद साधण्याची शक्यता : २३ सप्टेंबरला नागपूर दौरा

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून नियोजनाला सुरुवात झाली असून, बूथ पातळीपर्यंतची प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे. मागील विधानसभा निवडणूक व लोकसभा निवडणुकीत नागपूर जिल्ह्यासह विदर्भात महायुतीला अपेक्षित जागा न मिळाल्यामुळे पक्षाकडून विशेष पावले उचलण्यात येत आहेत. याअंतर्गतच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे स्वतः नागपुरात येऊन विदर्भातील जागांचा आढावा घेणार असून, ते २३ सप्टेंबर रोजी कोअर कमिटीच्या सदस्यांसोबत संवाददेखील साधण्याची शक्यता असल्याची माहिती पक्षातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे.

मागील काही दिवसांपासून भाजपचे वरिष्ठ नेते व मध्य प्रदेशचे कॅबिनेट मंत्री कैलास विजयवर्गीय हे संपूर्ण जिल्हा पिंजून काढत आहेत. त्यांनी शहरातील सहा व जिल्ह्यातील सहा, अशा बारा जागांवरील तयारीचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला असलेल्या दक्षिण पश्चिम मतदारसंघाच्या नियोजनाबाबत त्यांच्याच उपस्थितीत विजयवर्गीय यांनी जाणून घेतले होते. केंद्रीय नेतृत्वाने नागपूर जिल्ह्यावर विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या आहेत. याअंतर्गतच आता अमित शाह हे स्वतः नागपुरात येणार आहेत.

यावेळी ते जिल्ह्यातील बाराही जागांचा आढावा घेतील. तसेच ते विदर्भातील जागांबाबतदेखील सखोल आढावा घेणार आहेत. जिल्हा व ग्रामीणच्या कोअर कमिटीच्या सदस्यांसोबत ते संवाद साधतील अशी अपेक्षा आहे. याबाबत बुधवारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना स्पष्टता देण्यात आली. २३ सप्टेंबर रोजी अमित शाह यांच्या उपस्थितीत ही बैठक कुठे आयोजित करायची याबाबत भाजप पदाधिकाऱ्यांकडून दोन ते तीन विविध पर्यायांचा विचार सुरू आहे सध्या केवळ अमित शाह यांच्या दौऱ्याची तारीख निश्चित झाली असून, आढावा बैठकीचे स्वरूप दोन दिवसांत अंतिम होईल, अशी माहिती एका पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

इच्छुक उमेदवारांशी संवाद साधणार का? विदर्भातील काही मतदारसंघात भाजपच्याच आजी किंवा माजी आमदारांमध्ये तिकिटासाठी चढाओढ सुरू आहे. पक्षात कुठलाही असंतोष नको व गटबाजी नको, असे केंद्रीय नेतृत्वाने २ अगोदरच स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर अमित शाह अशा इच्छुक उमेदवारांशी संवाद साधणार का, याबाबत अद्याप भाजपच्या शहर पदाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना करण्यात आलेल्या नाहीत.

टॅग्स :Amit Shahअमित शाहnagpurनागपूर