नागपुरात कूलरचा करंट लागल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 00:54 IST2018-06-12T00:54:11+5:302018-06-12T00:54:22+5:30
अजनीतील बजरंगनगरात राहणारे शुभम अशोक काते (वय २२) यांचा कूलरचा करंट लागल्याने मृत्यू झाला.

नागपुरात कूलरचा करंट लागल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अजनीतील बजरंगनगरात राहणारे शुभम अशोक काते (वय २२) यांचा कूलरचा करंट लागल्याने मृत्यू झाला. रविवारी मध्यरात्रीनंतर ते कूलरजवळ पाण्याची मोटर सुरू आहे की नाही ते बघण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना करंट लागला. मिळालेल्या सूचनेवरून अजनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
दोघांनी लावला गळफास
कळमन्यातील दुर्गानगरात राहणारा कुमार सुधांशु पप्पू पांडे (वय १५) या शाळकरी मुलाने गळफास लावून आत्महत्या केली. सोमवारी दुपारी २.२० वाजता ही घटना उघडकीस आली. मिळालेल्या सूचनेवरून कळमना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.
अशाच प्रकारे गिट्टीखदानमधील गनोबा मंदिरजवळ, मानसेवा नगरात राहणारे जयेंद्र जनार्दन महाजन (वय ४०) यांनी सोमवारी सकाळी गळफास लावून आत्महत्या केली. वच्छला जनार्दन महाजन (वय ६०) यांनी दिलेल्या सूचनेवरून गिट्टीखदान पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
रेल्वेगाडीतून पडून अनोळखी इसमाचा मृत्यू
अज्ञात रेल्वेगाडीतून पडून जखमी झालेल्या अनोळखी इसमाचा मेयो रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. संबंधित इसमाचे वय अंदाजे ५० ते ५५ वर्षे असून उंची ५ फूट ६ इंच, रंग काळा-सावळा, शरीर मध्यम, चेहरा गोल आहे. हा इसम रेल्वेस्थानक कळंबाजवळ अज्ञात रेल्वेगाडीतून खाली पडल्याने गंभीर जखमी झाला. त्याला जीटी एक्स्प्रेसने नागपुरात आणण्यात आले. त्यास उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तपास शेख बाबर करीत आहेत.