शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
2
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
3
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
4
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
5
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
6
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
7
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
8
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
9
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
10
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
11
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
12
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
13
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
14
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
15
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
16
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
17
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
18
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
19
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
20
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
Daily Top 2Weekly Top 5

पेंचचे ‘बझर’ क्षेत्र संचालकांच्या नियंत्रणात

By admin | Updated: July 15, 2014 01:12 IST

पेंच व्याघ्र प्रकल्पातील वाघांची वाढती संख्या लक्षात घेता, या वाघांना अधिवासासाठी मुबलक जंगल उपलब्ध व्हावे, यासाठी पेंचच्या सभोवतालच्या बफर क्षेत्राचे नियंत्रण पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक

अधिसूचना जारी : नवीन अधिकारी व कर्मचारी मिळणार नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पातील वाघांची वाढती संख्या लक्षात घेता, या वाघांना अधिवासासाठी मुबलक जंगल उपलब्ध व्हावे, यासाठी पेंचच्या सभोवतालच्या बफर क्षेत्राचे नियंत्रण पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक व मुख्य वनसंरक्षकांच्या हाती सोपविण्यात आले आहे. यासंबंधी राज्याच्या महसूल व वन विभागाने अलीकडेच ८ जुलै रोजी एक अधिसूचना जारी केली आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाच्या (एनटीसीए) मार्गदर्शक सूचनेप्रमाणे कोणत्याही व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनवर संबंधित क्षेत्र संचालकांचे एकसंघ नियंत्रण असणे आवश्यक आहे. त्यानुसार राज्य शासनाने हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे.राज्य शासनाने आपल्या अधिसूचनेत बफर क्षेत्राच्या नियंत्रणासह सध्या येथे सुरू असलेली वानिकी कामेही पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालकांच्या नियंत्रणात चालतील, असे स्पष्ट केले आहे. शिवाय या बफर क्षेत्राच्या देखभालीसाठी काही अधिकारी व कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे. त्यासाठी गत काही दिवसांपूर्वी कोल्हापूर, नागपूर, गडचिरोली व यवतमाळ येथील काही वनक्षेत्र महाराष्ट्र वन विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. त्यामुळे नागपूर, गडचिरोली व यवतमाळ येथील वनवृत्तात कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांपैकी एक वन परिक्षेत्र अधिकारी, दोन वनपाल व १४ वनरक्षक यांची ३० जुलैपूर्वी पेंच व्याघ्र प्रकल्पात पदस्थापना करून, त्यासंबंधीचा अहवाल शासनाकडे सादर करण्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबलप्रमुख) यांच्या सूचना करण्यात आल्या आहेत. पेंच देशभरातील २५ व्याघ्र प्रकल्पापैकी एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणून ओळखला जातो. येथे पट्टेदार वाघांसह बिबट, चितळ, हरीण, नीलगाय, कोल्हा व जंगली कुत्री यासारख्या वन्यप्राण्यांसह विविध दुर्मिळ पक्ष्यांचा अधिवास आढळून येतो. त्यामुळे गत काही वर्षांत पेंच पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे.(प्रतिनिधी)