शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

एका छताखाली पर्यटनाचे अनेक पर्याय

By admin | Updated: January 23, 2016 03:00 IST

इंडिया इंटरनॅशनल ट्रॅव्हल एक्झिबिशन (आईआईटीई) चे शुक्रवारी महापौर प्रवीण दटके यांच्याहस्ते उत्तर अंबाझरी मार्गावरील कुसुमताई वानखेडे सभागृहात उद्घाटन करण्यात आले.

इंडिया इंटरनॅशनल ट्रॅव्हल एक्झिबिशन : महापौरांच्या हस्ते उद्घाटननागपूर : इंडिया इंटरनॅशनल ट्रॅव्हल एक्झिबिशन (आईआईटीई) चे शुक्रवारी महापौर प्रवीण दटके यांच्याहस्ते उत्तर अंबाझरी मार्गावरील कुसुमताई वानखेडे सभागृहात उद्घाटन करण्यात आले. यावेळी नगरसेवक बंडू राऊत उपस्थित होते. प्रसंगी आयोजित पत्रपरिषदेत आईआईटीईचे व्यवस्थापक अनुराग गुप्ता यांनी सांगितले की, प्रदर्शनात आठ राज्यांच्या पर्यटन मंडळासह खासगी ट्रॅव्हल कंपन्यांचे ४४ स्टॉल लागले आहेत. पर्यटनास इच्छूक असणाऱ्यांना विविध राज्यातील तसेच दुबई, थायलंड व देशातील उत्कृष्ट पर्यटन स्थळांवर निवास, भोजन व आदी व्यवस्थेसंदर्भात माहिती मिळते आहे. ते म्हणाले की, पर्यटन व्यवसाय सध्या तेजीत आहे. पर्यटन म्हणजे निव्वळ फिरणे नसून मानसिक शांती मिळविण्यासाठी एक उत्कृष्ट माध्यम आहे. अशांसाठी प्रदर्शनात एका छताखाली पर्यटनाचे अनेक पर्याय उपलब्ध आहे. २४ जानेवारी पर्यंत सकाळी ११.३० ते सायंकाळी ७.३० पर्यंत चालणाऱ्या प्रदर्शनात केंद्रीय पर्यटन विभागासह महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, केरळच्या पर्यटन विकास महामंडळांचे स्टॉल आहेत. मेक माय ट्रीप, कॉक्स अ‍ॅण्ड किंग्ज, थॉमस कुक, महिंद्रा हॉलिडेज, जोकोन्स बीच रिसॉर्ट, गोवा कंपनीचे स्टॉल्स सुद्धा येथे आहे. उत्तर प्रदेश पर्यटन महामंडळाचे संचालक अभिलाष शर्मा म्हणाले की भारतात दर्शनीय पर्यटन स्थळांची कमतरता नाही. उत्तर प्रदेशात लखनौ, वाराणसी, आगरा येथील चटोली गल्ली, नवाबी पान आदीचा आनंद घेता येऊ शकतो. गुजरात पर्यटन महामंडळाचे वरिष्ठ असोसिएट्स एक्झिक्युटीव्ह मॅनेजर बाप्पादित्य रॉय म्हणाले की, गुजरात मध्ये पर्यटन व्यवसायाला गती मिळाली आहे. येथे बघण्यासाठी भरपूर काही आहे. मध्य प्रदेश डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे रेसिडेंट मॅनेजर युवराज पडोळे यांनी मध्य प्रदेशात होणाऱ्या जलमहोत्सवाची, खजुराहो डान्स फेस्टिव्हल व सिंहस्थ कुंभमेळा (उज्जैन) बद्दल माहिती दिली. (वा. प्र.)