शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत नागपूर जिल्ह्यातील ४६ गावे होणार टंचाईमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 00:28 IST

राज्यातील ग्रामीण जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी घरी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री पेयजल कार्यक्रम राज्यात सुरू करण्यात आला. शासन निर्णयातील निकषानुसार या कार्यक्रमात नागपूर जिल्ह्यातील ५९ गावांचा समावेश करण्यात आला. परंतु तांत्रिक अडचणीपोटी यातून १३ गावे वगळण्यात आली. उर्वरित ४६ गावांमध्ये हा कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर यांनी सांगितले.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशा सावरकर यांची माहिती

आॅनलाईन लोकमतनागपूर : राज्यातील ग्रामीण जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी घरी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री पेयजल कार्यक्रम राज्यात सुरू करण्यात आला. शासन निर्णयातील निकषानुसार या कार्यक्रमात नागपूर जिल्ह्यातील ५९ गावांचा समावेश करण्यात आला. परंतु तांत्रिक अडचणीपोटी यातून १३ गावे वगळण्यात आली. उर्वरित ४६ गावांमध्ये हा कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर यांनी सांगितले. जिल्ह्यातील ५९ गावांचा समावेश करण्यात आला तरी, यातील ८ गावे मोठी असल्याने त्या ठिकाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणतर्फे नळयोजनेची कामे सुरू आहेत. तसेच ३ गावांमध्ये इतर योजनेतून नळयोजनेची कामे सुरू असल्याने एकूण ११ गावे मुख्यमंत्री पेयजल योजनेतून वगळण्यात आली. तसेच रामटेक अंतर्गत मौजा पचखेडी येथे प्रकल्पित लोकसंख्या १००० पेक्षा कमी असल्याने ही कामे सादरीकरणात शासनातर्फे रद्द करण्यात आली. अशी १३ गावे कार्यक्रमातून कमी करण्यात आली. या योजनेसंदर्भात ४३ गावांचे सादरीकरण शासन समितीसमोर करण्यात आले आहे. यातील ३० गावांना शासनाकडून मान्यता प्राप्त झाली आहे. या कामाची निविदा प्रक्रियाही पार पडली आहे. २४ योजनांचे कार्यारंभ आदेशही देण्यात आले आहे. तर मौजा मानेगाव, वाघोडा, खंडाळा खुर्द येथील कामे सुरू करण्यात आली आहेत. मंजूर ३० कामावर १९.५८ लाख रुपये खर्च अंदाजित आहे. उर्वरित १३ कामांवर ७.५२ लाख रुपये अंदाजित खर्च आहे. या कार्यक्रमांतर्गत शासनाकडून ५१.४४ लाख निधी जि.प.ला प्राप्त झाला असल्याचे अध्यक्षांनी सांगितले.

टॅग्स :Waterपाणीnagpurनागपूर