नागपुरात अनियंत्रित स्टार बसने धडक दिल्यामुळे युवती गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 23:44 IST2019-10-30T23:43:18+5:302019-10-30T23:44:13+5:30

भाऊबीज साजरी करून स्कुटीवर परत येणारी एक युवती अनियंत्रित झालेल्या स्टार बसमुळे गंभीर जखमी झाली आहे. प्रतापनगर चौकात बुधवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Uncontrolled star bus dashed young girl seriously injured in Nagpur | नागपुरात अनियंत्रित स्टार बसने धडक दिल्यामुळे युवती गंभीर

नागपुरात अनियंत्रित स्टार बसने धडक दिल्यामुळे युवती गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भाऊबीज साजरी करून स्कुटीवर परत येणारी एक युवती अनियंत्रित झालेल्या स्टार बसमुळे गंभीर जखमी झाली आहे. प्रतापनगर चौकात बुधवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. समीक्षा सागर मेश्राम (२२) रा. डब्ल्यूसीएल कॉलनी, जरीपटका असे गंभीर जखमी झालेल्या युवतीचे नाव आहे. समीक्षाचे आईवडिल जयताळात राहतात. सोमवारी भाऊबीज असल्यामुळे समीक्षा माहेरी गेली होती. ती सीताबर्डीत एका खाजगी संस्थेत काम करते. सकाळी ११.३० वाजता स्कुटीवर ती जयताळावरून सीताबर्डीला जात होती. प्रतापनगर चौकात स्टार बस क्रमांक एम एच. ३१, ई. एन-०३९६ च्या चालकाने समिक्षाला धडक दिली. समीक्षा स्कुटीसह बसच्या समोरील चाकात अडकली. ती बसच्या चाकात काही अंतर घासत गेल्यामुळे गंभीर जखमी झाली. हे पाहून नागरिकांची गर्दी जमा झाली. प्रतापनगर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी जखमी समिक्षाला मेडिकलमध्ये पोहोचविले. तेथे तिच्यावर उपचार सुरु आहेत. बस चालक नितीन सेलुकर ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाल्याचे सांगत असून पोलिसांनी चौकशी करून अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.
 

Web Title: Uncontrolled star bus dashed young girl seriously injured in Nagpur