अनियंत्रित इनोव्हाने ई-रिक्षाचालकास चिरडले ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:08 IST2021-05-20T04:08:09+5:302021-05-20T04:08:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बुधवारी सकाळी एका भरधाव इनोव्हाने ई-रिक्षाचालकाचा चिरडले. ग्रेट नाग रोड येथील बैद्यनाथ चौकात ही ...

Uncontrolled Innova crushes e-rickshaw driver () | अनियंत्रित इनोव्हाने ई-रिक्षाचालकास चिरडले ()

अनियंत्रित इनोव्हाने ई-रिक्षाचालकास चिरडले ()

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : बुधवारी सकाळी एका भरधाव इनोव्हाने ई-रिक्षाचालकाचा चिरडले. ग्रेट नाग रोड येथील बैद्यनाथ चौकात ही घटना घडली. ई-रिक्षाचालकास चिरडल्यानंतर इनोव्हा रोड डिव्हायडरवर धडकून पलटली. वाहनांची गर्दी नसल्याने मोठा अनर्थ टळला. वामन विष्णू पराते (५९, रा. बिनाकी मंगळवारी) असे मृताचे नाव आहे.

पराते ई-रिक्षाचालक होते. ते बुधवारी सकाळी १०.३० वाजता बैद्यनाथ चौकाकडून अशोक चौकाकडे जााणाऱ्या रस्त्यावर प्रवाशांची प्रतीक्षा करीत होते. त्याचवेळी बैद्यनाथ चौकातून इनोव्हा (क्र. एमपी-०४-सीक्यू-२४८९) भरधाव वेगाने आली. इनोव्हा अशोक चौकाच्या दिशेने जात होती. समोर जात असलेल्या कारला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात चालकाने कारची गती आणखी वाढविली. यामुळे कार अनियंत्रित झाली आणि पराते यांच्या ई-रिक्षास धडक दिली. या अपघातात पराते गंभीर जखमी झाले. पराते यांना धडक दिल्यानंतर इनोव्हा कार डिव्हायडरला जाऊन धडकली आणि पलटली. याचवेळी इनोव्हातील बलून उघडल्याने चालक आनंद सुखदेव अरखेल (३३, रा. स्वीपर कॉलनी, न्यू सुभेदार लेआउट) गंभीर जखमी झाला नाही. रस्त्याने जात असलेल्या नागरिकांनी पराते यांना ततडीने मेडिकलला पोहोचवले. तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी आनंद अरखेल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. आनंद मनपामध्ये सफाई कामगार आहे. इनोव्हा सीव्हीएम ब्रेवरेज कंपनीची आहे. आनंद मॅकेनिककडे कार घेऊन जात होता. लॉकडाऊनमुळे घटनेच्या वेळी बैद्यनाथ चौकात फारशी वर्दळ नव्हती. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. पराते यांच्या कुटुंबात पत्नी, दोन मुलं आणि मुलगी आहे.

Web Title: Uncontrolled Innova crushes e-rickshaw driver ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.