चोऱ्या करणाऱ्या मामा-भाच्यांना अटक ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:09 IST2021-02-11T04:09:32+5:302021-02-11T04:09:32+5:30

नागपूर : कामगार बनून बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या समोरील बंदघरात चोरी करणारी टोळी कळमना पोलिसांच्या हाती लागली आहे. पोलिसांनी ...

Uncles and nephews arrested for stealing () | चोऱ्या करणाऱ्या मामा-भाच्यांना अटक ()

चोऱ्या करणाऱ्या मामा-भाच्यांना अटक ()

नागपूर : कामगार बनून बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या समोरील बंदघरात चोरी करणारी टोळी कळमना पोलिसांच्या हाती लागली आहे. पोलिसांनी या टोळीचा सूत्रधार आणि त्याच्या दोन भाच्यासह चार आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून घटनेची माहिती घेऊन ३.२१ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

शेख जावेद ऊर्फ बबलू शेख भुरू (४५) रा. मोठी मशीद, यशोधरानगर, त्याचा भाचा सय्यद तौसिफ सय्यद आसिफ (१८) रहमतनगर अमरावती, अयफाज शेख अनिस शेख (३०) रा. उस्मानाबाद बीड आणि तेजस रत्नाकर गुरव (२८) रा. स्वामीनारायण मंदिराजवळ वाठोडा, अशी आरोपींची नावे आहेत. जुना कामठी येथील रहिवासी राजेंद्र परतेकी २० डिसेंबर २०२० रोजी आडेगाव येथील आपल्या शेतीवर गेले होते. दरम्यान त्यांच्या घरातील ६४ हजार रुपयाचे दागिने पळविण्यात आले. कळमना पोलिसांना तपासात आरोपींचा समावेश असल्याची माहिती मिळाली. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता चोरीचा खुलासा झाला. आरोपींनी कळमना ठाण्याच्या परिसरातून सहा घरात चोरी केल्याचे कबूल केले. बबलू तौसिफ आणि अयफाजचा मामा आहे. तौसिफ अमरावती व अयफाज बीडमध्ये राहतो. बबलूने दोघांना चोरी करण्यासाठी नागपूरला बोलावले. बबलू दोन भाच्यांसोबत कामगाराचा वेश घालून वस्त्यात फिरत होता. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या समोर बंद असलेल्या घराचा शोध घेत होते. सायंकाळी ६ ते ८ दरम्यान आरोपी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीसमोर उभे राहत होते. त्यांना कामगार समजून कुणी शंका घेत नव्हते. संधी मिळताच तौसिफ आणि अहफाज घरात प्रवेश करीत होते, तर बबलू बाहेर उभा राहून परिसराची पाहणी करीत होता. काही धोका असल्यास तो आपल्या भाच्यांना सतर्क करायचा. तो चोरी केलेले दागिने सराफा दुकानदार तेजस गुरवला विकत होते. पोलिसांनी तेजसलाही अटक केली आहे. ही कारवाई उपायुक्त नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विश्वनाथ चव्हाण, उपनिरीक्षक अनिल इंगोले, हवालदार दिलीप जाधव, चंद्रशेखर यादव, शिपाई प्रशांत गभणे, प्रफुल्ल ढवळे, धनराज सिंगूवार, अजय शुक्ला, प्रशांत लांजेवार यांनी केली.

Web Title: Uncles and nephews arrested for stealing ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.