मामाने केली भाचीची छेडखानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:11 IST2021-08-26T04:11:16+5:302021-08-26T04:11:16+5:30

नागपूर : मानकापुरात एका नराधमाने कोल्ड ड्रिंकमध्ये नशेचे औषध मिसळवून भाचीची छेडखानी केल्याची घटना घडली आहे. १५ वर्षीय पीडित ...

Uncle Kelly teases niece | मामाने केली भाचीची छेडखानी

मामाने केली भाचीची छेडखानी

नागपूर : मानकापुरात एका नराधमाने कोल्ड ड्रिंकमध्ये नशेचे औषध मिसळवून भाचीची छेडखानी केल्याची घटना घडली आहे. १५ वर्षीय पीडित विद्यार्थिनी आपल्या आईसोबत रक्षाबंधनासाठी मामाच्या घरी आली होती. रक्षाबंधन करून तिची आई घरी परतली., तर पीडित विद्यार्थिनी मामाच्या घरी थांबली. आरोपी मानकापूरमध्ये चौकीदार म्हणून काम करतो. तो तेथे एका खोलीत राहतो. मंगळवारी दुपारी तो भाचीला सोडण्यासाठी गिट्टीखदान येथील घरी सोडण्याच्या बहाण्याने मानकापूरच्या खोलीवर घेऊन गेला. तेथे कोल्ड ड्रिंकमध्ये नशेचे औषध टाकून त्याने भाचीची छेडखानी केली. सतर्क असल्यामुळे भाचीने आरडाओरड केल्यानंतर त्याने तिला सोडून दिले. भाचीने घरी पोहोचल्यानंतर मामाच्या कृत्याची माहिती कुटुंबीयांना दिली. त्यानंतर मामाविरुद्ध मानकापूर ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी छेडखानी तसेच पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

.......

पाठलाग करून विद्यार्थिनीची छेडखानी

नागपूर : नंदनवनमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून छेडखानी करणाऱ्या आरोपीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अक्षय महेश कुंभलकर (१९) असे आरोपीचे नाव आहे. अक्षयने मंगळवारी सायकलवरस्वार १७ वर्षांच्या विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिच्याशी आपत्तीजनक व्यवहार केला. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

........

Web Title: Uncle Kelly teases niece