शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
3
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
4
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
5
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
6
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
8
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
10
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
12
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
13
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
14
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
15
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
16
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
17
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

युनानी, सिद्धा, होमिओपॅथी प्रवेश चाचणी निकालाला हिरवी झेंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 10:44 AM

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी युनानी, सिद्धा व होमिओपॅथी पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश चाचणीचा निकाल घोषित करण्यास हिरवी झेंडी दाखवली.

ठळक मुद्देहायकोर्टाचा निर्णयआयुर्वेदच्या निकालावरील स्थगिती कायम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी युनानी, सिद्धा व होमिओपॅथी पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश चाचणीचा निकाल घोषित करण्यास हिरवी झेंडी दाखवली. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला. परंतु, मूळ वाद आयुर्वेद पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश चाचणीशी संबंधित असल्याने या चाचणीच्या निकालावरील स्थगिती कायम ठेवण्यात आली.या चारही पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी २४ जून २०१८ रोजी प्रवेश चाचणी झाली. नेक्सटेक टेक्नॉलॉजी कंपनीच्या कामठी रोडवरील कॉम्प्युटर लॅबमध्ये चाचणीदरम्यान ‘मास चिटिंग’ झाल्याचा आरोप आहे. यासंदर्भात आयुर्वेद अभ्यासक्रमाच्या किशोर सोनवाणेसह एकूण १८ विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने गेल्या गुरुवारी स्थगिती दिल्यामुळे चारही अभ्यासक्रमांचा निकाल थांबविण्यात आला होता.केंद्रीय आयुष मंत्रालयाचे वकील अ‍ॅड. उल्हास औरंगाबादकर यांनी आज, प्रवेश चाचणीतील व्यवस्थेवर केवळ आयुर्वेद अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा आक्षेप असल्याचे सांगून, अन्य अभ्यासक्रमांच्या प्रवेश चाचणीचा निकाल घोषित करण्याची परवानगी देण्याची विनंती केली. तसेच, या प्रकरणात उत्तर दाखल करण्यासाठी ३० जुलैपर्यंत वेळ वाढवून मागितला.न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांनी त्यांची विनंती मंजूर करून, प्रकरणावर ३१ जुलै रोजी पुढील सुनावणी निश्चित केली. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. अनुप ढोरे यांनी बाजू मांडली. अ‍ॅड. औरंगाबादकर यांना अ‍ॅड. नीरजा चौबे यांनी सहकार्य केले.

असे आहे प्रकरणदेशातील २० शहरांमध्ये अखिल भारतीय आयुष पदव्युत्तर प्रवेश चाचणी झाली. परीक्षा केंद्रांमध्ये नेक्सटेक टेक्नॉलॉजी कंपनीच्या कॉम्प्युटर लॅबचा समावेश होता. या केंद्रामध्ये परीक्षा अधिकाऱ्यांनी योग्य पद्धतीने कर्तव्य बजावले नाही. विद्यार्थी एकमेकांशी चर्चा करून उत्तरे सोडवत असताना त्यांना कुणीच टोकत नव्हते. याचिकाकर्त्यांनी लगेच परीक्षा अधिकाऱ्यांकडे तक्रार केली, पण त्यांची दखल घेण्यात आली नाही. त्यानंतर याचिकाकर्त्यांनी अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचे संचालक, जरीपटका पोलीस व शहर पोलीस आयुक्तांकडे तक्रारी केल्या. परीक्षा केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्याची विनंती केली, परंतु याचिकाकर्त्यांचे कुणीच ऐकले नाही.

टॅग्स :Medicalवैद्यकीय