उमरेड - नागपूर महामार्गावरील उटी येथे भीषण अपघातात तीन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 10:39 PM2019-08-28T22:39:25+5:302019-08-28T22:41:07+5:30

टाटा सुपर एसची दुचाकीला जोरदार धडक लागून तिघेजण ठार झाल्याची घटना उमरेड-नागपूर महामार्गावर असलेल्या उटी (भिवापूर) शिवारातील नर्सरीजवळ बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.

On Umrer - Nagpur highway at Ooty Three killed in fatal accident | उमरेड - नागपूर महामार्गावरील उटी येथे भीषण अपघातात तीन ठार

उमरेड - नागपूर महामार्गावरील उटी येथे भीषण अपघातात तीन ठार

Next
ठळक मुद्देटाटा सुपर एसची दुचाकीला धडक

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर (उमरेड/कुही) : टाटा सुपर एसची दुचाकीला जोरदार धडक लागून तिघेजण ठार झाल्याची घटना उमरेड-नागपूर महामार्गावर असलेल्या उटी (भिवापूर) शिवारातील नर्सरीजवळ बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात योगिता सुमित वाढवे (२५), राजिता जगदीश कुमरे (२५) दोघेही रा. चांपा ता. उमरेड आणि प्रमोद श्रीराम उईके (४०) रा. तारणा ता. कुही यांचा मृत्यू झाला. तिघेही नातेसंबंधातील असल्याचे बोलले जाते. याप्रकरणी टाटा सुपर एसचा चालक शेख इमरान शेख मुश्ताक (३१) रा.मोठा ताजबाग, नागपूर याला कुही पोलिसांनी अटक केली आहे. 


तारणा येथील रहिवासी प्रमोद उईके हे दुचाकीने गिरड, जि.वर्धा येथे औषधोपचारासाठी जात होते. उमरेड तालुक्यातील चांपा येथून गिरडला सकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास तिघेही पॅशन प्रो गाडी क्रमांक एम.एच.४०/ए.वाय. ६७९१ ने निघाले. जात असतानाच उमरेड येथून नागपूरच्या दिशेने भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणाने वाहन चालवित दुचाकीला टाटा सुपर एस मालवाहू गाडीची (एम.एच.४९/डी.४५९३) जोरदार धडक लागली. दुचाकी चालक प्रमोद उईके हा आपल्या मार्गाने जात असताना उलट दिशेने येणाऱ्या मालवाहु वाहनाची धडक लागली. अपघात इतका जोरदार होता की दुचाकी आणि टाटा सुपर एस ही दोन्ही वाहने चेंदामेंदा झाली. यामध्ये दुचाकी चालक प्रमोद उईके आणि योगिता वाढवे यांचा घटनास्थळीत मृत्यू झाला. राजिता कुमरे ही गंभीर जखमी झाली होती. अपघात होताच नागरिकांची घटनास्थळी गर्दी उसळली. अनेकांनी मदतीचा हात दिला. पोलिसांना सूचना देण्यात आली. पाचगाव चौकी येथील पोलीस घटनास्थळी पोहोचले. लागलीच गंभीर अवस्थेत राजिता कुमरे यांना नागपूर येथील शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आले. उपचारादरम्यान राजिता यांचीही प्राणज्योत मालविली. चारचाकी वाहनाच्या चालकास पोलिसांनी अटक केली असून २७९, २३७, ३३८, ३०४ अ, सहकलम १४४ कलमान्वये कुही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कुहीचे पोलीस निरीक्षक पंजाबराव परघणे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के करीत आहेत.

Web Title: On Umrer - Nagpur highway at Ooty Three killed in fatal accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.