उमरेड खरेदी विक्री संघाने जोपासले शेतकऱ्यांचे हित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:11 IST2020-12-30T04:11:50+5:302020-12-30T04:11:50+5:30

उमरेड : डबघाईस आलेली उमरेडची खरेदी विक्री समिती पुनरुज्र्जीवित झाल्यानंतर अनेक अडचणीतून मार्गक्रमण करीत ही संस्था अधिक बळकट झाली. ...

Umred buying and selling team protects the interests of farmers | उमरेड खरेदी विक्री संघाने जोपासले शेतकऱ्यांचे हित

उमरेड खरेदी विक्री संघाने जोपासले शेतकऱ्यांचे हित

उमरेड : डबघाईस आलेली उमरेडची खरेदी विक्री समिती पुनरुज्र्जीवित झाल्यानंतर अनेक अडचणीतून मार्गक्रमण करीत ही संस्था अधिक बळकट झाली. सोबतच शेतकऱ्यांचेही हित जोपासले, असे गौरवोद्गार मान्यवरांनी व्यक्त केले. माजी मंत्री राजेंद्र मुळक यांच्या अध्यक्षतेखाली आमदार राजू पारवे यांच्या उपस्थितीत उमरेड विकास खंड सहकारी शेतकी खरेदी विक्री समितीची वार्षिक आमसभा पार पडली. जिचकार सभागृहात आयोजित सभेत लोकप्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. सभेला संस्थेचे सभापती गजानन झाडे, पद्माकर कडू, संजय मेश्राम, दिलीप भोयर, विठ्ठल हुलके, बालाराम राऊत, रामाजी कन्नाके, सुरेश पौनीकर, मधुकर लांजेवार, बालू भोयर, ज्योती देशमुख, बाळू लोहकरे, सुरेश वाघमारे, चंद्रशेखर ठवकर, शिवदास कुकडकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन झाडे यांनी केले. संचालन सूरज कांबळे यांनी केले. आभार सूरज इटनकर यांनी मानले.

गुरुदेव गेडेकर, सचिन कडू, विनायक खोंडे, घनश्याम नारनवरे, नामदेव कुंभरे, जयंत गिरडकर, लक्ष्मण वाढई, मधुकर भोयर, पुंडलिक श्रीखंडे, अ‍ॅड. अमोल पोंगडे, शशिकला बेले, रुखमा लाडेकर, गजानन ढोले आदींनी सहकार्य केले.

-----

उमरेड विकास खंड सहकारी शेतकी खरेदी विक्री समितीच्या आमसभेत उपस्थित मान्यवर. (२८ युएमपीएच ०३)

Web Title: Umred buying and selling team protects the interests of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.