शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

‘तिच्या’साठी गहिवरले उमरेडकर : हजारो नागरिक रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 7:34 PM

‘निर्भया हम शरमिंदा है, बलात्कारी जिंदा है’....असा संतापाचा उद्रेक करीत जोरदार गगनभेदी घोषणांनी गुरुवारी उमरेड दणाणले. चौकाचौकातून महिला, तरुणी आणि लोकांचे जथ्थेच्या जथ्थे एकवटत गेले. सुरुवातीला केवळ हजारावर निघालेला हा सर्वपक्षीय मोर्चा सरतेशेवटी १० हजाराहून उमरेडकरांच्या स्वयंस्फूर्त उपस्थितीने लक्षवेधी ठरला. ‘गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, वेकोलिच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा’ अशी एकमुखी मागणी रेटत उमरेडकर गरजले, रस्त्यावर उतरले. वाहनांचीही चाके थांबली. दुकानांचे ‘शटर’ अगदी सकाळपासूनच बंद होते. शाळा, महाविद्यालयांनाही सुटी देण्यात आली होती. बंद शंभर टक्के यशस्वी ठरला.

ठळक मुद्देकडकडीत बंद, शाळांनाही सुटी : बंद शांततेत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘निर्भया हम शरमिंदा है, बलात्कारी जिंदा है’....असा संतापाचा उद्रेक करीत जोरदार गगनभेदी घोषणांनी गुरुवारी उमरेड दणाणले. चौकाचौकातून महिला, तरुणी आणि लोकांचे जथ्थेच्या जथ्थे एकवटत गेले. सुरुवातीला केवळ हजारावर निघालेला हा सर्वपक्षीय मोर्चा सरतेशेवटी १० हजाराहून उमरेडकरांच्या स्वयंस्फूर्त उपस्थितीने लक्षवेधी ठरला. ‘गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, वेकोलिच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा’ अशी एकमुखी मागणी रेटत उमरेडकर गरजले, रस्त्यावर उतरले. वाहनांचीही चाके थांबली. दुकानांचे ‘शटर’ अगदी सकाळपासूनच बंद होते. शाळा, महाविद्यालयांनाही सुटी देण्यात आली होती. बंद शंभर टक्के यशस्वी ठरला.गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास सुभाषचंद्र बोस चौकातून विविध घोषणा देत मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर मुख्य मार्गाने मार्गक्रमण करीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर बायपास चौकातून, संत जगनाडे महाराज भिसी नाका चौक परिसरात मोर्चाने काही वेळ थांबा दिला. त्यानंतर तहसील कार्यालयासमोर पोलिसांनी मोर्चा अडविला.येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मोर्चाचे रूपांतर सभेत करण्यात आले. सभेला माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी संबोधित केले. मोर्चादरम्यान काही अपवाद वगळता मोर्चाला कोणतेही गालबोट लागले नाही. केवळ दोन पक्षीय गटाचे राजकारण शिजत असल्याची बाब नागरिकांच्या लक्षात येताच, संताप व्यक्त झाला. काहीवेळ मोर्चा थांबला. त्यानंतर दोन्ही पक्ष नरमले. नागरिक एकवटले आणि गगनभेदी घोषणांचा ‘पाऊस’ पुन्हा सुरू झाला. मोर्चातील शिष्टमंडळाने माजी मंत्री राजेंद्र मुळक यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी जनार्दन लोंढे, नागपूर जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे निवेदन सोपविले. त्यानंतर मोर्चाचा समारोप करण्यात आला.मोर्चात आमदार सुधीर पारवे, नगराध्यक्षा विजयलक्ष्मी भदोरिया, माजी नगराध्यक्ष गंगाधर रेवतकर, सामाजिक कार्यकर्ते राजू पारवे, जैबुन्निसा शेख तसेच राजू मेश्राम, सूरज इटनकर, धीरज यादव, राजा आकरे, सुधाकर खानोरकर, सुरेश पौनीकर, संजय मेश्राम, सुरेश चिचमलकर, मधुकर लांजेवार, रूपचंद कडू, संजय मोहोड, पदमाकर कडू, विलास झोडापे, प्रकाश मोहोड, रितेश राऊत, मनीष शिंगणे, जितू गिरडकर, गोलू जैस्वानी, प्रदीप चिंदमवार, राजानंद कावळे, विशाल देशमुख, कांचन रेवतकर, अमोल चचाने, दिलीप सोनटक्के, गंगाधर फलके, राजेश भेंडे, दिलीप गुप्ता, बाळू इंगोले, तुळशीदास चुटे, मंगेश गिरडकर, राजेश वानखेडे, मंगल पांडे, अर्चना हरडे, तक्षशीला वाघधरे, माधुरी भिवगडे, किरण नागरीकर, मनीषा लोहकरे, हाफिज शेख, वसीम पटेल, रामेश्वर सोनटक्के, सुनील मने, सतीश चौधरी, गिरीश लेंडे, उमेश वाघमारे, अरुण गिरडकर, मुकेश आंबोने, घनश्याम लव्हे, विकास लांजेवार, काजल मेंढे, सीमा वैद्य, अंकिता नान्हे, प्रेरणा सवाईमूल, स्नेहल सहारे, स्वराली वैरागडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

ती व्हेंटिलेटरवर

 नागपूरच्या आॅरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेल्या अत्याचार पिडीत तरुणीची प्रकृती अत्यावस्त असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. बुधवारी तिच्या चेहºयावर सर्जरी करून तुटलेले हाड जोडण्यात आले. गुरुवारी तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. तिचा एक डोळा पूर्ण निकामी झाला आहे. या घटनेचा तिच्या मेंदूला जबर धक्का बसला असल्याचेही डॉक्टरांचे म्हणणे आहे. तिच्या प्रकृतीकडे डॉ. राजेश अटल व रुग्णालयाची चमू लक्ष ठेवून आहे. 

टॅग्स :Rapeबलात्कारagitationआंदोलन