शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

‘मिनीबार’चा अखेर बंदोबस्त

By admin | Updated: January 17, 2017 01:44 IST

हुडकेश्वर रोडवरील इंगोलेनगर चौकातील खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांवर दारूच्या बाटलीसह, पाणीपाऊच व ग्लासची व्यवस्था करून दिली जात असल्याने सूर्य मावळताच येथे ‘तळीरामां’ची जत्रा भरली जायची.

खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांवर कारवाई : इंगोलेनगरातील तळीरामांच्या जत्रेला ‘ब्रेक’नागपूर : हुडकेश्वर रोडवरील इंगोलेनगर चौकातील खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांवर दारूच्या बाटलीसह, पाणीपाऊच व ग्लासची व्यवस्था करून दिली जात असल्याने सूर्य मावळताच येथे ‘तळीरामां’ची जत्रा भरली जायची. चौकातून रहदारी करणारे सामान्य पादचारी व महिलांची मोठी कुचंबणा व्हायची. गेल्या अनेक वर्षांपासून हा उघड्यावर मिनी बीअरबार सुरू होता.‘मिनीबार’चा अखेर बंदोबस्त ‘लोकमत’ने ‘इंगोलेनगर चौकात भरते तळीरामांची जत्रा’ या मथळ्याखाली सोमवारी वृत्त प्रसिद्ध करताच खळबळ उडाली. हुडकेश्वर पोलिसांच्या उपस्थित महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने चौकातील सर्व हातागाड्यांवर कारवाई केली. इंगोलेनगर चौकातील तथाकथित मिनीबार सामान्यांसाठी डोकेदुखी ठरला होता. या अवैध मिनीबारवर आधारित अनेक व्यवसाय फुलले होते. जवळच्या वाईन शॉप किंवा देशी दारूच्या दुकानामधून दारूची बाटली विकत घेऊन तळीराम या हातगाड्यांवर यायचे. तीन रुपयांचे पाणीपाऊच, पाच रुपयांचे एक अंडे किंवा शेंगदाण्याचे पॅकेट घेऊन चौकात बिनधास्तपणे दारू रिचवायचे. उघड्यावर सहज दारू पिता येत असल्याने सायंकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत दारूच्या पार्ट्या चालात होत्या. चौकातच असलेल्या रिकाम्या लॉनच्या जागेचा वापरही या पार्ट्यासाठी व्हायचा. दारूची नशा चढल्याने भांडणे, मारामारी नेहमीचे झाले होते. ‘लोकमत’ चमूच्या पाहणीत या चौकातील हातठेल्यांवर मद्य पिणाऱ्यांमध्ये तरुण मोठ्या प्रमाणात येत असल्याचे दिसून आले. बारमध्ये बसून मदिरेचा प्याला ओठाला लावणे खिशाला परवडत नसल्यामुळे हे तरुण या चौकातील अवैध मिनीबारचा आश्रय घेत होते. वशेष म्हणजे, या हातगाड्यांवर मजूरवर्गच नव्हे तर मध्यमवर्गीय व श्रीमंत लोकही गर्दी करायचे. या चौकातून दररोज रहदारी करणाऱ्या नागरिकांना, शाळेतील विद्यार्थ्यांना, महिलांना हा समाजविघातक धंदा दिसत होता, परंतु शहरातील पोलीस प्रशासनाला का नाही दिसत? हा जनसामान्यांचा प्रश्न होता. पोलिसांनाही या मिनीबारवाल्यांचा हप्ता पोहचतो की, काय असे वाटावे एवढी भीषण परिस्थिती घटनास्थळावर गेल्यावर दिसून आली होती. या रस्त्यांनी व चौकातून जाताना कुणी दारुडा अंगावर येऊन काय करेल याचा नेम राहिला नसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये दहशत होती. याला ‘लोकमत’ने १६ जानेवारीच्या अंकात वाचा फोडली. अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई‘लोकमत’च्या वृत्ताची दखल महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने घेतली. सायंकाळी इंगोलेनगर चौकात खाद्यपदार्थांचे हातठेले लागताच पथकाने पोलिसांच्या सहकार्याने आठ हातगाड्यांवर कारवाई केली. हातगाड्यांमधील सामान जप्त केले, तर काही हातठेले हटविण्यात आले. चौकात पोलिस तैनात इंगोलेनगर चौकात सोमवारी सायंकाळी हुडकेश्वर पोलीस ठाण्यातील पोलिसांचा बंदोबस्त पहायला मिळाला. पोलीस दिसताच अनेकजण चौकात न थांबताच सामोर जाऊन कानोसा घेत असल्याचे दिसून आले. बऱ्याच वर्षानंतर चौकातील तळीरामांच्या जत्रेला ब्रेक लागल्याने लोकांनी याचे स्वागत केले.