शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
5
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
6
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
7
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
8
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
9
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
10
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
11
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
12
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
13
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
14
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
15
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
16
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
17
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
18
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
19
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
20
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी

युआयडीएआयचे राज्यातील पहिले आधार केंद्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 11:31 PM

जिल्हा प्रशासनाच्या विशेष पुढाकाराने युआयडीएआयचे राज्यातील पहिले आधार सेवा केंद्र नागपुरात उघडण्यात आले असून शुक्रवारपासून ते नागरिकांच्या सेवेत रुजू झाले आहे.जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी पत्रपरिषदेत याबाबत सविस्तर माहिती दिली.

ठळक मुद्देऑनलाईन अपॉयमेंटचीही सुविधा : इतर जिल्ह्यांमध्येही होणार सुरु

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आधार कार्ड काढण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे आपापल्या स्तरावर आधार सेवा केंद्र सुरु करण्यात आले आहेत. परंतु आता स्वत: युआयडीएआय (युनिक आयडेंटिफिकेशन अ‍ॅथोरिटी ऑफ इंडिया) आपले स्वत:चे आधार सेवा केंद्र सुरु करणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या विशेष पुढाकाराने युआयडीएआयचे राज्यातील पहिले आधार सेवा केंद्र नागपुरात उघडण्यात आले असून शुक्रवारपासून ते नागरिकांच्या सेवेत रुजू झाले आहे.जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी पत्रपरिषदेत याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी आधारचे सहायक महासंचालक सुमनेश जोशी उपस्थित होते.'यूआयडीएआय'द्वारे सुरु करण्यात आलेले आधार सेवा केंद्र हे मानकापूर परिसरातील सादिकाबाद येथे असलेल्या पासपोर्ट ऑफिस कार्यालयाच्या परिसरातच आहे. दररोज ५०० वर आधार एन्रोलमेंट किंवा रिक्वेस्ट अपडेट करण्याची या आधार सेवा केंद्राची क्षमता आहे. या आधार सेवा केंद्रावर जाण्यासाठी नागरिक ऑनलाईन अपॉईंटमेंटही घेऊ शकतात. आधार केंद्रात नव्या आधार कार्डसाठी अर्ज किंवा एन्रोल करण्यासह तुम्ही यूआयडीएआय डेटाबेसमध्ये नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, जन्मतारीख, लिंग अथवा बायोमेट्रिक डेटा (फिंगरप्रिंट किंवा आयरिस) बदलून घेऊ शकता. हे आधारकेंद्र आठवड्यातील सातही दिवस सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३० या वेळेत सुरू राहणार आहे. केंद्रावर दिवसाला ५०० वर आधार नोंदणी केल्या जाऊ शकणार आहे. याशिवाय ज्यांचे जुने आधारकार्ड गहाळ झाले असेल. त्यांना युआयडीच्या संकेतस्थळावर ‘ऑर्डर प्रिंट’ या लिंकवर जाऊन आपल्या आधारकार्डची माहिती भरावी लागणार आहे. सोबतच नवीन आधारकार्डसाठी नाममात्र फी देखील भरावी लागेल. यानंतर अवघ्या दोन-तीन दिवसात संबंधितांना पोस्टाच्या माध्यमातून त्यांचे आधारकार्डची नवी प्रिंट पाठविण्यात येईल, असे आधारचे सहायक महासंचालक सुमनेश जोशी यांनी सांगितले.अशी घ्या अपॉईंटमेंट?पायलट प्रोजेक्टच्या धर्तीवर महाराष्ट्रातील नागपुरात हे आधार केंद्र सुरू करण्यात आले आहे. या आधार केंद्रावर सध्या ८ काऊंटर सुरू करण्यात आले असून, लवकरच त्याची संख्या १६ होणार आहे. या आधार नोंदणी केंद्रावर नागरिक स्वत: ‘अपॉयमेंट्स. युआयडीएआय.जीओव्ही.इन’ या पोर्टलवर जाऊन ऑनलाईन ’अपॉयमेंट’ घेऊ शकतात. त्यांना १ टोकन नंबर मिळाल्यानंतर त्यांनी तो टोकन नंबर घेऊन त्या केंद्रावर जाऊन आपले आधारशी संलग्नित काम करावयाचे आहे. तसेच केंद्रावर जाऊनही अपॉयमेंट घेतल्या जाऊ शकते.९९.७८ टक्के नागरिकांचे आधारकार्ड तयार२०११ च्या जनगणनेनुसार नागपूर जिल्ह्याची एकूण लोकसंख्या ४६,५३,५७० इतकी आहे. तर २०१५ नुसार ४९,२२,०८१ एवढी आहे. यापैकी ४९,१०,७८२ नागरिकांची आधार नोंदणी झाली आहे. म्हणजेच जवळपास ९९.७८ टक्के इतके काम पूर्ण झाले आहे. याशिवाय जिल्ह्यातील ४८ आपले सरकार सेवा केंद्रावर, ४४ बँकांमध्ये, ७८ पोस्ट ऑफिसमध्ये व ३ बीएसएनएल कार्यालयांमध्ये आधार नोंदणी केंद्र सुरू असल्याचेही जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डcollectorजिल्हाधिकारीnagpurनागपूरMediaमाध्यमे