उद्धव ठाकरेंनी स्वत:चे पायपुसणे करून घेतले; उपमुख्यमंत्री शिंदे यांचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 11:22 IST2025-12-12T11:21:11+5:302025-12-12T11:22:27+5:30
घटनाबाह्य हा शब्द त्यांचा आवडता शब्द दिसतोय. बहुधा त्यांना बाबासाहेबांची घटना मान्य नसावी. त्यामुळेच ते वारंवार हा शब्द उच्चारत असतात. उपमुख्यमंत्रिपदासंदर्भात याचिका वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये दाखल आहेत.

उद्धव ठाकरेंनी स्वत:चे पायपुसणे करून घेतले; उपमुख्यमंत्री शिंदे यांचा पलटवार
नागपूर : ‘मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीसाठी उद्धव ठाकरेंनी स्वत:चे पायपुसणे करून घेतले. लोकांनी त्यांना जागा दाखवून दिली आहे. प्रत्येकाने आपले अंथरूण पाहूनच हातपाय पसरायला हवेत,’ अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विधान भवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.
अमेडिया कंपनीला २ महिन्यांत पैसे भरावेच लागणार; सहजिल्हा निबंधकांचा निकाल
शिंदे म्हणाले, ‘सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार सोडून हिंदुत्व खुंटीला टांगले, त्यांना हिंदुत्व शिकविण्याची आवश्यकता नाही. अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात कलम ३७० रद्द केले. हे बाळासाहेबांचे स्वप्न होते. त्यांच्यावर टीका करणे दुर्दैवी आहे.’ दोन नंबरच्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले, ‘दोन नंबरने झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना शेवटच्या नंबरवर बसवले आहे. मी मुख्यमंत्री होतो, तेव्हाही हे असंवैधानिक आणि घटनाबाह्य पद असल्याचे काही लोक म्हणत होते.
घटनाबाह्य हा शब्द त्यांचा आवडता शब्द दिसतोय. बहुधा त्यांना बाबासाहेबांची घटना मान्य नसावी. त्यामुळेच ते वारंवार हा शब्द उच्चारत असतात. उपमुख्यमंत्रिपदासंदर्भात याचिका वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये दाखल आहेत. त्या सर्वांचा अभ्यास करून बोलले असते तर बरे झाले असते. एक शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला, हे त्यांच्या पचनी पडलेले नाही.