तोंडाच्या वाफा दवडण्याशिवाय उद्धव ठाकरेंना येतेच काय ? देवेंद्र फडणवीसांचा सवाल : पराभवाच्या हताशेमुळे विरोधक शिवीगाळीवर उतरले
By योगेश पांडे | Updated: April 23, 2024 16:23 IST2024-04-23T16:19:35+5:302024-04-23T16:23:51+5:30
Nagpur : 'अडीच वर्षांत त्यांनी काहीच काम केले नाही. तोंडाच्या वाफा दवडण्याशिवाय उद्धव ठाकरेंना येतेच काय?': फडणवीसांचे टीकास्त्र

Devendra Fadanvis criticized Uddhav Thackerey of talking only ill of the government
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्धवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील वाद आणखी तापत असल्याचे दिसून येत आहे. फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर परत जोरदार टीकास्त्र सोडले आहे. अडीच वर्षांत त्यांनी काहीच काम केले नाही. तोंडाच्या वाफा दवडण्याशिवाय उद्धव ठाकरेंना येतेच काय असा सवाल फडणवीस यांनी केला.
नागपुरात सिताबर्डीतील गवळीपुरा येथील हनुमान जन्मोत्सवाच्या कार्यक्रमात फडणवीस मंगळवारी पोहोचले होते. त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात केलेले एक तरी काम दाखवा. २५ वर्षांपासून बृहन्मुंबई महानगरपालिका त्यांच्या ताब्यात आहे, मात्र तेथेही त्यांनी काहीच काम केले नाही. तोंडाच्या वाफा दवडण्याशिवाय त्यांना काहीच येत नाही. त्यांचे भाषण ठरलेले आहे. त्यांचे भाषण मी जशेचा तशे म्हणून दाखव शकतो, असे फडणवीस म्हणाले. लोकसभा निवडणूकीतील पराभव दिसत असल्याने सर्व विरोधक निराश झाले आहेत. पराभवाच्या हताशेमुळे ते शिवीगाळीवर उतरले आहेत. जेव्हा ते पंतप्रधान मोदींनी उद्देशून शिव्या देतात तेव्हा आमचा जास्त मोठा विजय होतो. बजरंगबली बुद्धी आणि शक्ती देतात. मी आमच्यासाठी बुद्धी व विरोधकांसाठी सुबुद्धी मागितली आहे, असा चिमटादेखील फडणवीस यांनी काढला.