दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू,दोघे गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 08:04 PM2019-08-30T20:04:51+5:302019-08-30T20:07:25+5:30

कोळसा भट्टीतून निघणाऱ्या ‘गॅसी फायर’ पाईप लाईनची स्वच्छता करताना दोन कामगारांचा धुरामुळे श्वास गुदमरून मृत्यू झाला.

Two workers died, two seriously due to suffocation | दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू,दोघे गंभीर

मृत हरिशंकर भलावी

Next
ठळक मुद्देनागपूरनजीकच्या बुटीबोरी येथील सनविजय रोलिंग मिलमधील दुर्दैवी घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (बुटीबोरी) : कोळसा भट्टीतून निघणाऱ्या ‘गॅसी फायर’ पाईप लाईनची स्वच्छता करताना दोन कामगारांचा धुरामुळे श्वास गुदमरून मृत्यू झाला. बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रातील सनविजय रोलिंग मिलमध्ये शुक्रवारी सकाळी ११ वाजता दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. हरिशंकर भलावी (३०) रा. विजना, जि. शिवनी, कैलास भलावी (२५) रा.मंडवा, जि. शिवनी, मध्यप्रदेश अशी मृत कामगारांची नावे आहेत. या अपघातातील विजय पराते (१९) व पंजी कौरती (२०) दोघेही रा.महुवाटोला, जि.शिवनी या दोघांची प्रकृती गंभीर आहे.
स्थानिक कामगारांनी दिलेल्या माहितीनुसार हरिशंकर भलावी व कैलास भलावी हे दोन्ही कामगार कंपनीतील ‘गॅसी फायर’ला स्वच्छ करण्याचे काम करीत होते. दोन्ही कामगार बराच वेळ होऊन बाहेर न आल्यामुळे विजय आणि पंजी त्यांना पाहण्यासाठी पाईप लाईनमध्ये शिरले. त्यांचाही जीव गुदमरल्यागत झाल्याने ते बाहेर आले. हरिशंकर आणि कैलास तिथे पडून असल्याची माहिती त्यांनी इतर कामगारांना दिली. कंपनीतील कामगारांनी लगेच ‘गॅसी फायर’ कडे धाव घेतली. कामगारांनी त्यांना बाहेर काढून बुटीबोरी येथील माया हॉस्पिटलला भरती केले. डॉक्टरांनी तपासणीदरम्यान हरिशंकर व कैलास यांना मृत घोषित केले. विजय पराते व पंजी कौरतीवर उपचार सुरू आहेत.
‘गॅसी फायर’मध्ये मोठ्या प्रमाणात कार्बन डायआॅक्साईड या वायूची गळती झाल्याने कामगारांना काम करताना पुरेसा आॅक्सिजन न मिळाल्याने ही घटना घडली असल्याची माहिती घटनास्थळावरील कामगारांनी दिली. घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळताच त्यांनी कंपनीत दाखल होत घटनास्थळाचा पंचनामा केला.
तर वाचला असता जीव
धोकादायक ठिकाणी काम करताना कामगारांना आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध होणे गरजेचे होते. सनविजय रोलिंग मिलच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. यासोबतच कंत्राटदारानेसुद्धा आपल्या कामगारांना सुरक्षा साधने का दिली नाही, अशी विचारणा कामगारांकडून केली जात आहे. या घटनेसाठी जबाबदार कंपनी व्यवस्थापन व कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी कामगारांनी केली आहे.





कंत्राटदार, फोरमनवर गुन्हा दाखल
एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणी फोरमन हरदेवसिंग प्रेमसिंग बामरा, विजेंद्रसिंग रामरजून कुशवाह व कंत्राटदार ब्रिजेश वीरेंद्र पाठक यांच्यावर भादंविच्या कलम २८७, ३३७, ३३८ व ३०४ अ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहे.

Web Title: Two workers died, two seriously due to suffocation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.