ई रिक्षातून दोन महिलांनी पळविले रोख, दागिने; पोलिसांकडून शोध सुरू
By दयानंद पाईकराव | Updated: May 26, 2024 16:46 IST2024-05-26T16:46:21+5:302024-05-26T16:46:30+5:30
ज्ञात महिलांनी अनुश्री यांची नजर चुकवून त्यांच्या बॅगमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख ३५०० रुपये असलेली लहान पर्स चोरून नेली

ई रिक्षातून दोन महिलांनी पळविले रोख, दागिने; पोलिसांकडून शोध सुरू
नागपूर : ई रिक्षात बसलेल्या दोन अज्ञात महिलांनी रामटेकवरून आलेल्या एका महिलेचे रोख व दागीने असा एकुण २ लाख ४२ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल पळविला.
ही घटना गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी २४ मे रोजी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. अनुश्री आनंद बारोकर (४५, रा. रामटेक) या गणेशपेठ बसस्थानकावरून सेलिब्रेशन हॉल, शाहु गार्डनसमोर जाण्यासाठी ई रिक्षात बसल्या. त्यावेळी दोन अनोळखी महिलाही त्यांच्यासोबत ई रिक्षात बसल्या. अज्ञात महिलांनी अनुश्री यांची नजर चुकवून त्यांच्या बॅगमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख ३५०० रुपये असलेली लहान पर्स चोरून नेली. या प्रकरणी अनुश्री यांनी दिलेल्या तक्रारीवरून गणेशपेठ पोलिसांनी अज्ञात दोन आरोपी महिलांविरुद्ध कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरु केला आहे.