शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

टू व्हीलर टॅक्सीज अनधिकृत : नागपूर आरटीओची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 00:05 IST

शहरात अनधिकृत सुरू असलेल्या ओलाच्या ‘वेबबेस्ड टू व्हीलर टॅक्सीज’वर प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहरने पुन्हा बुधवारपासून कारवाईची मोहीम हाती घेतली. चार दुचाकी जप्तही केल्या. मात्र, ‘अ‍ॅप’वर ही सेवा सुरूच असल्याने आरटीओकडून कंपनीवर काय कारवाई केली जाते याकडे आता लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देचार दुचाकी जप्त : कंपनीचे ‘अ‍ॅप’ सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात अनधिकृत सुरू असलेल्या ओलाच्या ‘वेबबेस्ड टू व्हीलरटॅक्सीज’वर प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहरने पुन्हा बुधवारपासून कारवाईची मोहीम हाती घेतली. चार दुचाकी जप्तही केल्या. मात्र, ‘अ‍ॅप’वर ही सेवा सुरूच असल्याने आरटीओकडून कंपनीवर काय कारवाई केली जाते याकडे आता लक्ष लागले आहे.परिवहन विभागाने राज्यात कुठेही ‘वेबबेस्ड’ किंवा तत्सम प्रकार ‘टू व्हीलरटॅक्सीज’ वरून प्रवासी वाहतूक करण्यासाठी कुणालाही परवानगी दिली नाही. मात्र, शहरात ‘ओला’ कंपनीने ‘टू व्हीलर टॅक्सीज’ सुरू केली आहे. पूर्वी या ‘टॅक्सीज’ नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानक, बर्डी व बसस्थानकावर सुरू होती. काही दिवसात या व्यवसायाने गती पकडली. या विरोधात विदर्भ ऑटोरिक्षा चालक फेडरेशनचे अध्यक्ष विलास भालेकर शिष्टमंडळासह शहर आरटीओ कार्यालयात धडकले. प्रवासी वाहतूक करताना परमिटची गरज असताना व ‘टू व्हीलर टॅक्सीज’ बाबत परिवहन विभागाने राज्यात कुणालाही परवानगी दिली नसताना शहरात ही प्रणाली का सुरू आहे, असा प्रश्न केला. दोषीवर कारवाई करण्याची मागणी केली. याला गंभीरतेने घेत आरटीओ शहर कार्यालयाने वायुपथकाला कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार ‘रॅपिडो अ‍ॅप’च्या ‘एमएच३१ बीझेड ४१६२, एमएच३१ डीएच ४३६५, जेके १० यु ३४५०, एमएच ४९ वाय २०६८ व एमएच ३१ बीक्यू ३०८९ या दुचाकींवर अनधिकृत व्यवसाय करीत असल्याची कारवाई करीत वाहने जप्त केली. नंतर ‘अ‍ॅप’ बंद पडले. परंतु आता ‘ओला’ कंपनीने ‘टू व्हीलर टॅक्सीज’ सुरू केली. याची दखल घेत १९ जून रोजी आरटीओच्या वायुपथकाने ‘एमएच ३१ एफके ४७०२’, ‘एमएच ३१ एसी ३४७३’, ‘एमएच ४९ एबी ६६७५’ व ‘एमएच ३१ डीए ५८७५’ ही वाहने जप्त केली.शहरात सुमारे ५० वर दुचाकी ‘वेबबेस्ड टू व्हिलर टॅक्सीज’ म्हणून धावत आहेत. विशेषत: वर्दळीच्या ठिकाणी या दुचाकीचा फायदा होत असल्याने थोड्याच दिवसात मागणीत वाढ झाली आहे. बुधवारी कारवाई झाली तरी ओला कंपनीच्या अ‍ॅपवर ‘टू व्हिलर टॅक्सीज’ धडाक्यात सुरू आहे. वायुपथकातील मोटार वाहन निरीक्षकांनी या ‘अ‍ॅप’वरून दुचाकी बुक करून जप्तीची कारवाई केल्याचे समजते.वाहन नोंदणी रद्द करणारकोणत्याही ‘वेबबेस्ड’ किंवा तत्सम प्रकार ‘टू व्हिलर टॅक्सीज’वरून प्रवासी वाहतूक करण्यासाठी कुठेच परवानगी देण्यात आलेली नाही. या विषयी तक्रार येताच चार ‘टू व्हिलर टॅक्सीज’ जप्त करण्यात आल्या आहेत. पुढील तीन महिन्यांसाठी या वाहनांची नोंदणीही रद्द केली जाणार आहे. संबंधित कंपनीवर कारवाईसाठी वरिष्ठांशी चर्चा सुरू आहे.अतुल आदेउपप्रादेशिक परिवहन अधिकारी, आरटीओ (शहर)

टॅग्स :Taxiटॅक्सीtwo wheelerटू व्हीलरnagpurनागपूर