दुचाकी स्लीप, चालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:18 IST2021-01-13T04:18:58+5:302021-01-13T04:18:58+5:30

कुही : चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव माेटरसायकल स्लीप झाली. यात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीचालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना ...

Two-wheeler sleep, driver killed | दुचाकी स्लीप, चालक ठार

दुचाकी स्लीप, चालक ठार

कुही : चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव माेटरसायकल स्लीप झाली. यात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीचालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना कुही पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील आंभाेरा-कुही. नागपूर मार्गावरील सावळी शिवारात शुक्रवारी (दि. ८) रात्री ७.३० वाजताच्या सुमारास घडली.

राकेश वामन बावनकुळे (३०, रा. अंबाडी, ता. कुही) असे मृताचे नाव आहे. ताे एमएच-४०/सीबी-४१८८ क्रमांकाच्या माेटरसायकलने एकटाच कुहीहून अंबाडीला जात हाेता. ताे सावळी शिवारातील नाग नदीच्या पुलाजवळ येताच नाल्यात ताेल गेल्याने त्याची माेटरसायकल स्लीप झाली आणि ताे खाली काेसळला. त्यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या मार्गाने जाणाऱ्यांनी अपघाताची माहिती पाेलिसांना दिली. पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कुही येथील ग्रामीण रुग्णालयात आणला. याप्रकरणी कुही पाेलिसांनी नाेंद करून तपास सुरू केला आहे.

Web Title: Two-wheeler sleep, driver killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.