अपार्टमेंटसमाेरून दुचाकी लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:13 IST2021-09-08T04:13:17+5:302021-09-08T04:13:17+5:30

बुटीबाेरी : अपार्टमेंटसमाेर उभी ठेवलेली माेटरसायकल चाेरट्याने चाेरून नेली. या माेटरसायकलची किंमत ३० हजार रुपये असून, ही घटना एमआयडीसी ...

Two-wheeler lamps from the apartments | अपार्टमेंटसमाेरून दुचाकी लंपास

अपार्टमेंटसमाेरून दुचाकी लंपास

बुटीबाेरी : अपार्टमेंटसमाेर उभी ठेवलेली माेटरसायकल चाेरट्याने चाेरून नेली. या माेटरसायकलची किंमत ३० हजार रुपये असून, ही घटना एमआयडीसी बुटीबाेरी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील एमआयडीसी परिसरातील सुकळी राेडवर रविवारी (दि. ५) मध्यरात्री घडली.

दिनेश नत्थूजी मंडल (५६, रा. साई अपार्टमेंट, सुकळी राेड, ता. हिंगणा) यांनी त्यांच्या मालकीची एमएच-४०/बीयू-४८९४ क्रमांकाची माेटरसायकल नेहमीप्रमाणे अपार्टमेंटसमाेर लाॅक करून ठेवली हाेती. दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास परिसरात कुणीही नसल्याचे पाहून चाेरट्याने ती माेटरसायकल चाेरून नेली. परिसरात शाेध घेऊन ती कुठेही आढळून न आल्याने त्यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. या माेटरसायकलची किंमत ३० हजार रुपये असल्याचे त्यांनी पाेलिसांना सांगितले. याप्रकरणी एमआयडीसी बुटीबाेरी पाेलिसांनी आराेपीविरुद्ध भादंवि ३७९ अन्वये गुन्हा दखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस हवालदार इकबाल शेख करीत आहेत.

Web Title: Two-wheeler lamps from the apartments