अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू, दाेघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:11 IST2021-07-14T04:11:48+5:302021-07-14T04:11:48+5:30

काटाेल : परस्पर विरुद्ध दिशेने येणाऱ्या दाेन दुचाकीची समाेरासमाेर धडक लागली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर, ...

Two-wheeler killed in road accident | अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू, दाेघे जखमी

अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू, दाेघे जखमी

काटाेल : परस्पर विरुद्ध दिशेने येणाऱ्या दाेन दुचाकीची समाेरासमाेर धडक लागली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर, अन्य दाेघे किरकाेळ जखमी झाले. ही घटना काटाेल शहरातील विश्रामगृह परिसरात साेमवारी (दि.१२) सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली.

ईश्वर राजाराम कातलाम (४०, रा. घरतवाडा, ता. काटाेल) असे मृताचे नाव असून, रहमत पठाण व हर्षल रक्षित, अशी जखमींची नावे आहेत. ईश्वर कातलाम हे आपल्या दुचाकीने गावाकडे जात हाेते. दरम्यान, विश्रामगृह परिसरात विरुद्ध दिशेने येणाऱ्या एमएच-४९/डब्ल्यू-६९२६ क्रमांकाच्या भरधाव दुचाकीने त्यांच्या दुचाकीला जाेरात धडक दिली. त्यात ईश्वर यांना गंभीररीत्या दुखापत झाली. तर अन्य दुचाकीस्वार रहमत पठाण व हर्षल रक्षित हे दाेघेही किरकाेळ जखमी झाले. नागरिकांनी जखमींना काटाेल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तिथे तपासणीअंती डाॅक्टरांनी ईश्वर यांना मृत घाेषित केले. याप्रकरणी काटाेल पाेलिसांनी गुन्हा नाेंदविला असून, तपास सुरू केला आहे.

Web Title: Two-wheeler killed in road accident