अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:38 IST2021-02-05T04:38:26+5:302021-02-05T04:38:26+5:30

जलालखेडा : अज्ञात भरधाव वाहनाने दुचाकीस्वाराला जाेरात धडक दिली. त्यात दुचाकीस्वार गंभीररीत्या जखमी झाला. ही घटना जलालखेडा येथे रविवारी ...

Two-wheeler injured in unidentified vehicle collision | अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

जलालखेडा : अज्ञात भरधाव वाहनाने दुचाकीस्वाराला जाेरात धडक दिली. त्यात दुचाकीस्वार गंभीररीत्या जखमी झाला. ही घटना जलालखेडा येथे रविवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.

महादेव ठाकरे (५०, रा. आमनेर, ता. वरूड, जि. अमरावती) असे जखमीचे नाव आहे. महादेव ठाकरे हे आपल्या एमएच-३५/४३७८ क्रमांकाच्या दुचाकीने आमनेरकडून पुनर्वसनाकडे जात हाेता. दरम्यान जलालखेडा येथे मागून येणाऱ्या अज्ञात भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला जाेरात धडक दिली. त्यात महादेव यांना गंभीररीत्या दुखापत झाली. शिवाय दुचाकीचा चुराडा झाला. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक घटनास्थळाहून पसार झाला. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला जलालखेडा प्राथमिक आराेग्य केंद्रात नेले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

जलालखेडा येथील मुख्य रस्त्यावर गतिराेधक नसल्याने वाहने सुसाट धावतात. या मार्गात गतिराेधक लावण्याची मागणी अनेकदा करण्यात आली. परंतु, अद्यापही गतिराेधक लावले नाही. त्यातच हा अपघात घडल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या गलथान कारभारावर संताप व्यक्त केला.

Web Title: Two-wheeler injured in unidentified vehicle collision