दुचाकीची गाईला धडक, चालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:12 IST2021-08-18T04:12:31+5:302021-08-18T04:12:31+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क काटाेल : भरधाव माेटरसायकलने बैलगाडीला मागे बांधलेल्या गाईला जाेरात धडक दिली. त्यात गाय गंभीर जखमी झाली ...

Two-wheeler hits cow, driver dies | दुचाकीची गाईला धडक, चालकाचा मृत्यू

दुचाकीची गाईला धडक, चालकाचा मृत्यू

लाेकमत न्यूज नेटवर्क

काटाेल : भरधाव माेटरसायकलने बैलगाडीला मागे बांधलेल्या गाईला जाेरात धडक दिली. त्यात गाय गंभीर जखमी झाली असून, दुचाकीचालकाचा मृत्यू झाला. ही घटना काटाेल पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील काटाेल-सावरगाव मार्गावरील साेनाेली शिवारात रविवारी (दि. १५) रात्री ७.३० वाजताच्या सुमारास घडली.

शुभम चंद्रभान उईके (२३, रा. शेंबडा, ता. नरखेड) असे मृताचे नाव आहे. देवीदास दामूजी खांबलकर (५०, रा. साेनाेली, ता. काटाेल) हे त्यांच्या बैलगाडीने शेतातून घरी जात हाेते. बैलगाडीला मागे दाेन गाई बांधल्या हाेत्या. त्यातच शुभम एमएच-४०/एएन-२७०९ क्रमांकाच्या माेटरसायकलने काटाेलहून सावरगावच्या दिशेने जात हाेता. ताे साेनाेली शिवारात पाेहाेचताच त्याचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि दुचाकीने बैलगाडीच्या मागे बांधलेल्या गाईला जाेरात धडक दिली.

यात गाय गंभीर जखमी झाली असून, खाली काेसळल्याने शुभमलाही दुखापत झाली. त्याला लगेच काटाेल येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डाॅक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घाेषित केले. याप्रकरणी काटाेल पाेलिसांनी भादंवि २७९, ४२९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास सहायक फाैजदार जवाहर चव्हाण करीत आहेत.

Web Title: Two-wheeler hits cow, driver dies