वर्धेत दोन दुचाकी चोरट्यांना केले जेरबंद

By Admin | Updated: May 30, 2017 17:26 IST2017-05-30T17:26:16+5:302017-05-30T17:26:16+5:30

गोपनिय माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत सावंगी पोलिसांना दोन दुचाकी चोरट्यांना जेरबंद करण्यात यश आले आहे.

Two-wheeled thieves in Ward | वर्धेत दोन दुचाकी चोरट्यांना केले जेरबंद

वर्धेत दोन दुचाकी चोरट्यांना केले जेरबंद


आॅनलाईन लोकमत

वर्धा : गोपनिय माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत सावंगी पोलिसांना दोन दुचाकी चोरट्यांना जेरबंद करण्यात यश आले आहे. सदर चोरट्यांकडून पोलिसांनी चोरीच्या तब्बल आठ दुचाकी जप्त केल्या आहेत. सलमान खाँ अजीज खाँ पठाण (२४) रा. कारला व शंकर कवडू पंधराम (२३) रा. गजानननगर असे अटक केलेल्या आरोपींची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अटक केलेल्या आरोपींपैकी एक आरोपी दररोज वेगवेगळी दुचाकी वापर असल्याची माहिती सावंगी पोलिसांना मिळली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सुरूवातीला शंकर पंधराम याला ताब्यात घेतले. पोलिसांनी अधिकची माहिती जाणून घेतली असता शंकर जवळ असलेल्या दुचाकीचे कागदपत्रे त्याच्या जवळ नसल्याचे पुढे आहे. सुरूवातीला उडवा-उडवीची उत्तरे देणाऱ्या शंकरला पोलिसी हिसका मिळताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
त्यांच्याकडून विविध ठिकाणावरून चोरलेल्या एकूण आठ दुचाकी जप्त केल्या आहेत.


सलमान नागपुरातून तर शंकर दुचाकी चोरायचा वर्धेतून

अटकेत असलेले दोन्ही आरोपी वर्धा जिल्ह्यातील रहिवासी असले तरी सलमान हा नागपुरातील गर्दीच्या ठिकाणावरून तर शंकर हा वर्धेतील गर्दीच्या ठिकाणावरून दुचाकी लंपास करीत होता. नागपुरातून चोरलेली दुचाकी वर्धेत तर वर्धेतून चोरलेली दुचाकी विल्हेवाट लावण्यासाठी नागपुरात पाठविल्या जात असल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात समोर आले आहे.

 

 

Web Title: Two-wheeled thieves in Ward