भरदिवसा घरासमाेरून दुचाकी लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:08 IST2021-03-27T04:08:47+5:302021-03-27T04:08:47+5:30

सावनेर : घरासमाेर उभी ठेवलेली माेटारसायकल चाेरट्याने चाेरून नेली. त्या माेटारसायकलची किंमत ३० हजार रुपये आहे. ही घटना खापा ...

Two-wheeled lamps from home all day | भरदिवसा घरासमाेरून दुचाकी लंपास

भरदिवसा घरासमाेरून दुचाकी लंपास

सावनेर : घरासमाेर उभी ठेवलेली माेटारसायकल चाेरट्याने चाेरून नेली. त्या माेटारसायकलची किंमत ३० हजार रुपये आहे. ही घटना खापा (ता.सावनेर) शहरात बुधवारी (दि.२४) सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली.

विनायक कवडू तिळलेकर (४२, रा.पंचशीलनगर, सावनेर) हे त्यांच्या एमएच-४०/एएम-४०९३ क्रमांकाच्या माेटारसायकलने त्यांच्या सासऱ्यांकडे खापा येथे आले हाेते. त्यांनी ती माेटारसायकल सासऱ्यांच्या घरासमाेर ठेवली हाेती. दरम्यान, सकाळी १०.३० ते ११.३० वाजताच्या दरम्यान कुणाचेही लक्ष नसताना चाेरट्याने ती माेटारसायकल चाेरून नेली. सर्वत्र शाेध घेऊन ती कुठेही आढळून न आल्याने, त्यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. त्या माेटारसायकलची किंमत ३० हजार रुपये असल्याचे त्यांनी पाेलिसांना सांगितले. या प्रकरणी खापा पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध भादंवि ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास सहायक फाैजदार विजय बारई करीत आहेत.

Web Title: Two-wheeled lamps from home all day