शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
2
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम कुणी केला? अखेर एस. जयशंकर यांचं वॉशिंग्टनमधून मोठं विधान, म्हणाले...
3
भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास
4
बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा
5
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
6
आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
7
"सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
8
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...
9
४ महिन्यांत ६० रुपयांवरून २५२ वर आला 'हा' शेअर; गुंतवणूकदार मालामाल, तुमच्याकडे आहे का?
10
गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...
11
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
12
धक्कादायक! टीव्ही अभिनेत्रीच्या एकुलत्या एक मुलाची आत्महत्या, ५७व्या मजल्यावरुन उडी मारून संपवलं जीवन
13
Chaturmas 2025: सुरु होतोय चातुर्मास; या चार महिन्यात कांदा-लसूण खाऊ नये, कारण...
14
तेजस्वीसोबत ब्रेकअप.. तिच्यासाठीच अनुषा दांडेकरला सोडलं? करण कुंद्रा म्हणतो, "पैसे लावा.."
15
रुकेगा भी नहीं और झुकेगा भी नहीं; नोवाक जोकोविचचा पुष्पा अवतार, फोटोची सोशल मीडियावर चर्चा!
16
शेजारी राष्ट्राकडे आलं इलॉन मस्कचं हाय-स्पीड इंटरनेट! एका महिन्याचा खर्च पाहून धक्का बसेल!
17
Pune Rape: तोंडावर स्प्रे फवारून तरुणीवर बलात्कार; डिलिव्हरी बॉयच्या कृत्यानं पुणे हादरलं
18
Mumbai Crime: शिक्षिका आधी कारमध्येच करायची बलात्कार, नंतर हॉटेलमध्ये...; वर्षभर केले विद्यार्थ्याचे शोषण; काय काय घडलं?
19
Bank of Baroda मध्ये जमा करा २,००,००० रुपये; मिळेल, ₹४७,०१५ चं फिक्स व्याज आणि हमीही, जाणून घ्या
20
आणखी एक मोठा अपघात, वैमानिकाचं नियंत्रण सुटलं, विमानतळाची भिंत तोडून विमान पुढे गेलं

नागपूरच्या जयस्तंभ चौकात बनणार ‘टू-वे’ उड्डाणपूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 00:44 IST

नागपूर रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजूला अर्थात जयस्तंभ चौक ते लोखंडी पुलापर्यंतच्या परिसराचा विकास करण्याची जबाबदारी महामेट्रोकडे सोपविली आहे. सेंट्रल रोड फंडाकडून प्राप्त २३२ कोटी रुपयांच्या या प्रकल्पांतर्गत जयस्तंभ चौक आणि लोखंडी पुलाच्या परिसरात जंक्शन विकासाचे काम होणार आहे. या कार्यासाठी बांधकाम विभागाची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली आहे. पण प्रकल्पाला मूर्तरूप महामेट्रो देणार आहे.

ठळक मुद्दे२३२ कोटींचा प्रकल्प : लोखंडी पुलाच्या बाजूला पुन्हा एक रेल्वे अंडरब्रीज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजूला अर्थात जयस्तंभ चौक ते लोखंडी पुलापर्यंतच्या परिसराचा विकास करण्याची जबाबदारी महामेट्रोकडे सोपविली आहे. सेंट्रल रोड फंडाकडून प्राप्त २३२ कोटी रुपयांच्या या प्रकल्पांतर्गत जयस्तंभ चौक आणि लोखंडी पुलाच्या परिसरात जंक्शन विकासाचे काम होणार आहे. या कार्यासाठी बांधकाम विभागाची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली आहे. पण प्रकल्पाला मूर्तरूप महामेट्रो देणार आहे.महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित पत्रपरिषदेत म्हणाले, या प्रकल्पांतर्गत मानस चौक आणि लोखंडी पूल परिसरात सर्वप्रथम जंक्शन आणि रस्त्याचा विकास करण्यात येणार आहे. याकरिता निविदा मागविण्यात आल्या आहेत. या प्रकल्पात रेल्वे स्थानकाच्या पश्चिम आणि पूर्व परिसरात तीन-तीन लेन राहणार आहेत. जयस्तंभ चौकात रामझुल्यापासून किंग्जवे हॉस्पिटलपर्यंत ‘टू-वे’ उड्डाणपूल बनविण्यात येणार आहे. कस्तूरचंद पार्ककडून स्थानकाकडे जाणाऱ्या वाहनांकरिता रामझुल्यापासून ‘यू-टर्न’ तयार करण्यात येणार आहे. रेल्वे स्थानकाकडून निघून रामझुला ते पूूर्व नागपुरात जाणाऱ्यांना गणेश टेकडीजवळ ‘यू-टर्न’ घेऊन जयस्तंभ चौकातील प्रस्तावित उड्डाण पुलावरून अथवा पुन्हा लोखंडी पुलाकडून जावे लागेल. दक्षिण नागपुरातून स्थानकावर येण्यासाठी जयस्तंभ चौकातून ‘यू-टर्न’ घ्यावा लागेल. मानस चौकात एक रोटरी बनविण्यात येईल. येथे मंदिर आणि तुलसीदास यांची प्रतिमा राहील.याच प्रकारे लोखंडी पुलाच्या (सध्याचा आरयूबी) एका बाजूला आरयूबी बनविण्यात येणार आहे. या आरयूबीचे बांधकाम रेल्वे वाहतुकीला अडथळा न आणता पूश बॉक्स तंत्रज्ञानाने होणार आहे. कॉटन मार्केट चौकात एक गोलाकार मार्ग बनविण्यात येणार असून, त्यामुळे जंक्शन सिग्नल फ्री होऊन वाहतूक सुरळीत सुरू राहील. या प्रकल्पात आधुनिक सायनेज, स्ट्रीट फर्निचर, स्ट्रीट लाईट आणि पादचाऱ्यांसाठी सुविधा राहील. या प्रकल्पात महामेट्रो, मनपा, रेल्वे, महसूल विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाची महत्त्वपूर्ण भूमिका राहणार असल्याचे दीक्षित यांनी सांगितले.टेकडी पुलाखालील दुकानदारांना मिळणार नवीन दुकानेप्रकल्पांतर्गत गणेश टेकडी मंदिरासमोरील उड्डाणपूल तोडण्यात येणार आहे. यापूर्वी उड्डाण पुलाखालील १७२ दुकानदारांचे पुनर्वसन एसटी महामंडळ, एमपीएसआरटीसी आणि मॉडेल हायस्कूलच्या जमिनीवर करण्यात येणार आहे. येथे आधुनिक स्वरूपाचा मॉल तयार करण्यात येईल. दुकाने खालच्या माळ्यावर राहतील तर दुसऱ्या आणि तिसऱ्या माळ्यावर पार्किंग राहील. लोकांना या ठिकाणावरून थेट एफओबीवरून रेल्वे स्थानकावर जाता येईल. या कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालय संबंधित जमिनीच्या अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण करणार आहे. जमीन सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपविली जाईल. त्यानंतर या ठिकाणी महामेट्रो मॉल उभारण्यात येणार आहे.

 

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर