शहरं
Join us  
Trending Stories
1
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
2
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
3
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
4
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
5
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
6
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
7
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
8
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
9
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
10
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
11
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
12
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
13
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
14
अजितदादांचे मत अन् निधीबाबत विधान, CM फडणवीसांचे थेट भाष्य; म्हणाले, “त्यांचा उद्देश...”
15
शरद मोहोळ हत्येतील पिस्तूल उमरटी गावातील; पुणे पोलिसांची मध्य प्रदेशमध्ये जबरदस्त कारवाई
16
फेसबुक मैत्री नडली! फेक ट्रेडिंग ॲपवर २.९० कोटींचे इन्व्हेस्टमेंट, नोएडात व्यापाऱ्याला महिलेनं 'असं' लुटलं
17
मोबाईल दिला नाही आणि आठवीत शिकणाऱ्या दिव्याने पाळण्याच्या दोरीनेच मृत्यूला मारली मिठी, नागपुरमधील चिंताजनक घटना
18
दिवसा काम अन् रात्री अभ्यास; स्वप्न सत्यात उतरवून 'तो' झाला IAS, संपूर्ण गावाला वाटतो अभिमान
19
बॉम्बची धमकी अन् 'गल्फ एअर'च्या प्रवाशांचे धाबे दणाणले; 'GF-274' मध्ये नेमकं काय घडलं?
20
अजब लव्हस्टोरी! दूध विकायला येणाऱ्या तरुणावर जडले प्रेम, ४ मुलांची जबाबदारी पतीवर टाकून पत्नी पळाली!
Daily Top 2Weekly Top 5

उन्मादाचे दोन बळी; नायलॉन मांजामुळे ५० च्यावर लोक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 18:35 IST

Nagpur : पतंगाच्या मागे धावत असताना हृदयविकाराचा झटका येऊन एका तरुणाचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मकर संक्रांतीच्या नावाखाली मंगळवारी दिवसभर पतंगबाजीचा उन्माद पाहायला मिळाला. नायलॉन मांजामुळे मेयो, मेडिकलसह खासगी रुग्णालयात जवळपास ५० वर जखमींवर उपचार करण्यात आले. धक्कादायक म्हणजे, पतंगाच्या मागे धावत असताना हृदयविकाराचा झटका येऊन एका तरुणाचा मृत्यू झाला, तर पतंग उडवित असताना अचानक तोल जाऊन पाचव्या मजल्यावरून खाली पडून एका युवकाचा मृत्यू झाला.

आपल्या संस्कृतीचा आनंद साजरा करताना दुसऱ्याचा बळी घेणे किंवा जखमी करणे हे कुठेही सांगितलेले नाही, पण तरीही दिवसभर हे पतंगबाज रस्त्यांवर, घराच्या छतांवर अक्षरशः धुमाकूळ घालीत होते. पतंगबाजांचा हा उन्माद आणि मस्ती उतरविण्यासाठी कठोर कायदे करण्यात आले असतानाही, त्याची विशेष अंमलबजावणी होताना आज दिसून आलेली नाही. अनेक ठिकाणी पतंगबाजांचा उन्माद सुरूच होता.

तोल गेला आणि पाचव्या मजल्यावरून खाली पडला सोहेल खान सलीम खान (२३) रा. गिट्टीखदान दुसऱ्या मृताचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, पाच मजल्यांवरील इमारतीवर सोहेल खान हा पतंग उडवित होता. त्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर सुरक्षा भिंत नव्हती. पतंग उडविण्याच्या नादात त्याचा तोल गेला आणि खाली पडला. त्याला गंभीर जखमी अवस्थेत मेयो हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. दरम्यान, उपचार सुरू असताना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

१७ टाके लागले चेहरा कापल्यामुळे मंगळवारी सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास मानकापूर उड्डाणपुलावरून एक महिला आपल्या दुचाकीने कामाच्या ठिकाणी जात असताना, अचानक समोर आलेल्या नायलॉनच्या मांजाने तिच्या हेल्मेटची काच कापून तिचा चेहरा कापला गेला. तातडीने मानकापूर येथील मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये (अॅलेक्सिस) दाखल करण्यात आले. चेहऱ्यावर १७ टाके लागल्याचे सांगण्यात येते. महिलेच्या पतीने सांगितले, तिने घरून दुपट्टा बांधला होता. हेल्मेटही होता.

मेयो-मेडिकलमध्ये १७ जखमींवर उपचार मेयो, मेडिकलमध्ये सायंकाळपर्यंत मांजामुळे जखमी झालेल्या १७ जखमींवर उपचार करण्यात आले. मेयोमध्ये सकाळच्या पाळीत तीन तर दुपारनंतर पाच असे सात जखमींवर उपचार करण्यात आले. मेडिकलमध्ये दिवसभरात १० जखर्मीवर उपचार करण्यात आले. यातील ७५ वर्षीय वृद्धाचा मांजाने पाय कापल्याने त्यांना वॉर्ड १७ मध्ये भरती करण्यात आले, तर १७ वर्षीय मुलाचे बोट गंभीररीत्या कापले गेल्याने वॉर्ड १५ मध्ये भरती करण्यात आले.

मित्रांसोबत पतंगाचा आनंद घेत असतानाच आला मृत्यू रितेश गंधश्रीवार (२७) रा. हुडकेश्वर त्या मृत तरुणाचे नाव. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास रितेश आपल्या चार-पाच मित्रांसोबत घरासमोरील मैदानात पतंग पकडण्यासाठी धावत होता. काही वेळानंतर तो मित्रासोबत हुडकेश्वर येथील पिपळा फाटा रोडवर नाश्ता करण्यासाठी गेला. रितेशने नाश्ता न करता छातीत दुखत असल्याचे सांगून औषधी घेण्यासाठी औषधी दुकानात आला असताना तिथेच कोसळला. मित्रांनी खासगी रुग्णालयात नेले. मेडिकलमध्ये मृत घोषित केले. 

टॅग्स :nagpurनागपूर