नागनदीसाठी दोन हजार कोटीचा शुद्धीकरण प्रकल्प

By Admin | Updated: July 25, 2015 03:15 IST2015-07-25T03:15:49+5:302015-07-25T03:15:49+5:30

शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या नागनदीचे शुद्धीकरण व परिसराचा विकास करण्यासाठी दोन हजार कोटींचा प्रकल्प प्रस्तावित आहे.

Two thousand crore purification project for Nag Nagi | नागनदीसाठी दोन हजार कोटीचा शुद्धीकरण प्रकल्प

नागनदीसाठी दोन हजार कोटीचा शुद्धीकरण प्रकल्प

स्थायी समिती : प्रकल्प आराखड्यासाठी कन्सलटंट नियुक्त करणार
नागपूर : शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या नागनदीचे शुद्धीकरण व परिसराचा विकास करण्यासाठी दोन हजार कोटींचा प्रकल्प प्रस्तावित आहे. तसेच गांधीसागर विकास योजना प्रस्तावित आहे. या दृष्टीने प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी कन्सलटंट नियुक्त करण्याच्या प्रस्तावाला शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
शहरातून वाहणाऱ्या १८ कि.मी.लांबीच्या नागनदीचे शुद्धीकरण करण्यासाठी एक हजार कोटीचा खर्च अपेक्षित आहे. नदीला पावसाळी नाले व पावसाळी नाल्या जोडलेल्या आहेत. काही ठिकाणी सिव्हर लाईन जोडण्यात आलेल्या आहे. त्यामुळे नदीचे पाणी दूषित झाले आहे. शहरातील दूषित पाणी नदीत जाऊ नये यासाठी सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार आहे. प्रक्रिया केल्यानंतरच पाणी नदीत सोडण्यात येणार आहे.
तसेच लगतच्या भागाचे रस्ते , पुलाचा विकास, काठावरील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन व काठावरील मोकळ्या जागांचा विकास केला जाणार आहे. गांधीसागरचा विकास आराखडा
शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या गांधीसागर तलावाचा विकास आराखडा प्रस्तावित आहे. यात तलावात बोटिंग, पाण्याचे शुद्धीकरण, परिसराचे सौंदर्यीक रण व उपाहारगृहाची सुविधा निर्माण करणे आदी विकास कामे प्रस्तावित आहे. यासाठी तलावाचे निरीक्षण करणे, १०० मीटर अंतरावरील सार्वजनिक सुविधा,तलावाचे सौंदर्यीकरण, मनपाच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी उपाययोजना करणे आदी कामे नवीन विकास आराखड्यात प्रस्तावित आहे. यासाठी कन्सलटंटला २१.४० लाख मिळणार आहे.

Web Title: Two thousand crore purification project for Nag Nagi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.