शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
3
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
4
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
5
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
6
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
7
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
8
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
9
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
10
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
11
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
12
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
13
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
14
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
15
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
16
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
17
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
18
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
19
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
20
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा

 नागपुरात स्टंटबाजी करणाऱ्या दोन तरुणी पोलिसांच्या ताब्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 9:22 PM

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या मनाईआदेशाचे उल्लंघन करून शुक्रवारी पोलिसांची कारवाई चुकविण्यासाठी दोन तरुणींनी गिट्टीखदान परिसरात चांगलीच स्टंटबाजी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या मनाईआदेशाचे उल्लंघन करून शुक्रवारी पोलिसांची कारवाई चुकविण्यासाठी दोन तरुणींनी गिट्टीखदान परिसरात चांगलीच स्टंटबाजी केली. मात्र सर्वत्र बंदोबस्तात असलेल्या पोलिसांनी या दोघींना अडवून त्यांच्याविरुद्ध कारवाई केली.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिसांनी शहरात सर्वत्र संचारबंदी लावली आहे. नागरिकांनी आपल्या घरातच राहावे, विनाकारण इकडेतिकडे फिरू नये, अशा सूचना आणि आवाहन पोलीस करीत आहेत. मात्र त्याला न जुमानता काही उपद्रवी मंडळी इकडून तिकडे फिरतात. त्यात तरुणींचाही समावेश आहे. अशाच पैकी एका मोपेडवर स्वार असलेल्या दोन तरुणी शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास भरधाव वेगात गिट्टीखदान चौक परिसरातून जात होत्या. एका ठिकाणी पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला असता, त्यांनी तेथे पोलिसांना कट मारून दुसरीकडे दुचाकी वळवली. मात्र दुसऱ्या भागातही पोलीस होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांना तिथे अडवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी तेथून पुन्हा पोलिसांना चुकवून दुसऱ्या मार्गाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पाहत असलेल्या तिसऱ्या ठिकाणच्या पोलिसांनी त्यांना अडवले. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले. पोलीस वाहनात बसून ठाण्यात नेले. तेथे त्यांना उठाबशा करावयास लावण्यात आले. त्यानंतर त्यांची दुचाकी जप्त करून पोलिसांनी त्यांच्यावर संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcorona virusकोरोना वायरस बातम्या