प्राणघातक हल्ल्यात दोघे गंभीर जखमी

By Admin | Updated: August 13, 2016 14:48 IST2016-08-13T14:44:07+5:302016-08-13T14:48:44+5:30

मुलांसोबत झालेल्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी तीन गुंडांनी सशस्त्र हल्ला चढवून मुलाच्या वडीलासह दोघांना गंभीर जखमी केले.

Two seriously injured in a deadly attack | प्राणघातक हल्ल्यात दोघे गंभीर जखमी

प्राणघातक हल्ल्यात दोघे गंभीर जखमी

>ऑनलाइन लोकमत
नागपूर : मुलांसोबत झालेल्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी तीन गुंडांनी सशस्त्र हल्ला चढवून मुलाच्या वडीलासह दोघांना गंभीर जखमी केले. शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास मोतीबाग रेल्वे वर्कशॉपच्या बाजूला ही घटना घडली. यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती.
अमित मेहरा, पांडू उर्फ सतीश नायडू आणि चिंत्या नागरे (रा. पंजाबी लाईन) अशी आरोपींची नावे आहे. त्यातील अमितसोबत जेवियर  अ‍ॅड्र्यू  यांचा मुलगा जॉन तसेच भाचा रॉकी या दोघांशी शुक्रवारी सायंकाळी भांडण झाले होते. आरोपी अमित त्यावेळी निघून गेला. त्यानंतर त्याने रात्री १० वाजता पांडू आणि चिंत्याला सोबत आणून जेवियर यांच्या घरावर हल्ला चढवला. जॉन आणि रॉकीला बाहेर काढण्यासाठी आरोपी शिवीगाळ करू लागले. त्यामुळे जेवियर यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला.  आरोपींनी धारदार शस्त्राने जेवियर  अ‍ॅड्र्यू  यांच्यावर हल्ला चढवला. ते पाहून रमेश गोदूलवार मदतीला धावले असता आरोपींनी रमेश यांनाही दगडाने डोक्यावर मारून गंभीर जखमी केले. या प्रकारामुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली. जखमींना रुग्णालयात दाखल केल्यानंतर कॅरलीन जेवियर अ‍ॅड्र्यू  यांनी जरीपटका पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. त्यांचा शोध घेतला जात आहे.

Web Title: Two seriously injured in a deadly attack