नागपुरात ‘एचएमपीव्ही’चे ते दोन रुग्ण संशयित

By सुमेध वाघमार | Updated: January 7, 2025 14:06 IST2025-01-07T12:26:27+5:302025-01-07T14:06:49+5:30

जिल्हाधिकारी इटनकर : एम्स व पुण्यातील प्रयोगशाळेचा अहवालानंतरच होणार पुष्टी

Two patients of 'HMPV' in Nagpur! A 17-year-old girl and a 7-year-old boy infected | नागपुरात ‘एचएमपीव्ही’चे ते दोन रुग्ण संशयित

Two suspected patients of 'HMPV' in Nagpur!

सुमेध वाघमारे 
नागपूर :
नागपुरात अद्यापही ‘ह्युमन मेटान्युमोव्हायरस’च्या (एचएमपीव्ही) रुग्णाची नोंद झाली नाही. जे दोन रुग्ण आढळून आले ते संशयित आहेत. त्यांचे नमुने अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) व पुण्याच्या ‘एनआयव्ही’ प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यावरच आजाराची पुष्टी केली जाइल अशी माहिती, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली.
     

प्रसारमाध्यमांवर ‘एचएमपीव्ही’चे दोन रुग्ण आढळून आल्याच्या वृत्ताने उपराजाधनीत खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी याला खोडून काढत ते रुग्ण संशयीत असल्याचे सांगितले. डॉ. इटनकर म्हणाले, संशयित रुग्णांमध्ये १४ वर्षांची मुलगी व ७ वर्षांचा मुलगा आहे. त्यांना सर्दी, खोकला व ताप असल्याने एका खासगी रुग्णालयातच त्यांची तपासणी करण्यात आली. त्यात ‘एचएमपीव्ही’ पॉझिटीव्ह आले. मात्र, शासकीय प्रयोगशाळेतून त्याची पुष्टी होणे गरजेचे आहे. म्हणून ‘एम्स’ व पुण्याच्या प्रयोगशाळेत हे नमुने पाठविण्यात आले आहेत. यात त्यांची त्याची ‘जिनोम सिक्वेंसिंग केली जाइल, तसेच ‘सिटी व्हॅल्यू २५’च्या खाली आल्यास आवश्यक उपाययोजना केल्या जातील. दोन दिवसांत तपासणीचा अहवाल येण्याची शक्यता आहे. या विषाणूबाबत आरोग्य सेवा महासंचालनालय आणि राष्टÑीय रोग नियंत्रण कें द्राच्या संचालकांनी मार्गदर्शकतत्वे प्रसीद्ध केले आहे. हा विषाणू आपल्यासाठी नवीन नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. परंतु खबरदारी घेणे आवश्यक आहे. शासकीय रुग्णालयांना अलर्ट करण्यात आले आहे. गरज पडल्यास स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात येइल, असेही ते म्हणाले. पत्रपरिषदेला एम्सचे संचालक डॉ. प्रशांत जोशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक सेलोकर आदी उपस्थित होते.

Web Title: Two patients of 'HMPV' in Nagpur! A 17-year-old girl and a 7-year-old boy infected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.