चालक झोपल्यावर डिझेलचोरी करणाऱ्या टोळीतील दोघांना अटक
By योगेश पांडे | Updated: March 22, 2024 17:55 IST2024-03-22T17:55:13+5:302024-03-22T17:55:46+5:30
नागपूर : उभ्या ट्रकमधून डिझेल चोरणाऱ्या टोळीतील दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून २९५ लीटर डिझेल जप्त ...

चालक झोपल्यावर डिझेलचोरी करणाऱ्या टोळीतील दोघांना अटक
नागपूर : उभ्या ट्रकमधून डिझेल चोरणाऱ्या टोळीतील दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून २९५ लीटर डिझेल जप्त करण्यात आले. नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. देवानंद विलास पवार (३०, अकोला) हे ट्रकचालक असून २१ मार्च रोजी रात्री पावणेचार वाजताच्या सुमारास ते लिहगाव येथील पाटील ढाब्यासमोर ट्रक उभा करून केबिनमध्ये झोपी गेले. त्यावेळी प्रणय रामचंद्र मेश्राम (२५, आशीर्वादनगर, ताजबाग) हा त्याच्या तीन सहकाऱ्यांसोबत ट्रकमधील डिझेल चोरी करत होता.
ढाब्यावरील लोकांना हा प्रकार दिसला व प्रणयला रंगेहाथ पकडले. त्याचे साथीदार पळून गेले. लोकांनी पोलिसांना बोलविले. प्रणयकडून माहिती घेऊन पोलिसांनी ललित उर्फ लल्ला सदानंद बाचलकर (३०, आशीर्वादनगर) याला अटक केली. दोघांच्याही ताब्यातून २९५ लीटर डिझेल जप्त करण्यात आले. पवारच्या तक्रारीवरून दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.