शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

‘लव्ह ट्रॅंगल’चा रक्तरंजित ‘ॲंगल’; बालपणीच्या मित्राचाच केला ‘गेम’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 11:34 IST

२४ तासांत नागपुरात दोन हत्या, शहरात चालले तरी काय?

नागपूर : उपराजधानीतील हत्यांचे सत्र सुरूच असून, बुधवारी नागपुरात दोन हत्यांची नोंद झाली. पाचपावली व एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या. पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बारसे नगरात दिवसाढवळ्या एका तरुणाची हत्या करण्यात आली. प्रेमाच्या त्रिकोणातून ही हत्या झाल्याची माहिती असून, आरोपी व मृतक बालपणीचे मित्रच होते. मात्र प्रेमाच्या वादातून मैत्रीचे नाते विसरत गुंड प्रवृत्तीच्या आरोपीने तरुणाचा धारदार शस्त्रांनी वार करत जीव घेतला, तर एमआयडीसीत घरगुती वादातून पतीने पत्नीचा कोयत्याने वार करत जीव घेतला.

अभिनव ऊर्फ शॅंकी महेंद्र भोयर (२२, बारसे नगर) असे मृताचे नाव असून, कशीश महाजन (२२, बारसेनगर) हा त्याचा बालपणीचा मित्र हत्येचा सूत्रधार आहे. शॅंकी व कशीश लहानपणापासून मित्र होते. कशीश हा गुंड प्रवृत्तीचा असून, त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नासह विविध गुन्हे दाखल आहेत. शॅंकी सेंट्रल एव्हेन्यूवरील एका हॉटेलमध्ये काम करायचा. त्याचे एका मुलीवर प्रेम होते, मात्र कशीशलादेखील ती आवडत होती. कशीशने तिला शॅंकीविरोधात भडकावले व तिने शॅंकीशी नाते तोडले. त्यानंतर कशीश व त्या मुलीमध्ये प्रेमप्रकरण सुरू झाले. यामुळे शॅंकी दुखावला गेला होता व त्याने कशीशशी बोलणे बंद केले होते. तो मुलीवर प्रेम करतच होता व कशीशला हे माहिती होते. यातूनच कशीशने शॅंकीला जिवे मारण्याची धमकी दिली होती.

काही महिन्यांअगोदर त्याने शॅंकीवर प्राणघातक हल्लादेखील केला होता. तो शॅंकीला संपविण्याची संधीच शोधत होता. बुधवारी दुपारी दीड ते दोनदरम्यान शॅंकी हा बारसे नगरातील झेंडा चौकातील एका चहा टपरीवर उभा होता. त्यावेळी कशीश तेथे गुल्लू मसुकर व विनीत या त्याच्या सहकाऱ्यांसह पोहोचला आणि शॅंकीशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यांनी त्याच्यावर भरदिवसा सर्वांच्या डोळ्यादेखत गळा, छाती, पाय, पोटावर धारदार शस्त्रांनी वार केले. शॅंकीचा भाऊ व इतर लोक धावल्यानंतर आरोपी पळून गेले. शॅंकीला दवाखान्यात नेण्यात आले, मात्र त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळावर पोहोचला. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा नोंदविला असून, त्यांचा शोध सुरू होता.

तीन वर्षांपूर्वी शॅंकीला झाली होती अटक

शॅंकी हादेखील गुंड प्रवृत्तीचाच होता. तीन वर्षांपूर्वी टिमकी भागात तलवारीचा धाक दाखवून तो नागरिकांना धमकावत होता. त्यावेळी तहसील पोलिस ठाण्यातील पथकाने त्याला अटक केली होती.

कोयत्याने वार करून पत्नीचा खून

दुसरी घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. घरगुती वादातून पतीने पत्नीवर कोयत्याने वार करून खून केला. सपना ऊर्फ सोनी (३०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली. निलडोहमधील रस्त्यावर पती-पत्नीचे कडाक्याचे भांडण सुरू होते. काही नागरिकांनी दोघांना समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र संतापाने पेटलेल्या पतीने तिच्यावर कोयत्याने वार करून खून केला. सोनीचा मृतदेह त्याने निलडोहच्या जंगलात फेकला व तेथून पलायन केले. एमआयडीसी पोलिस ठाण्यात याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक नरके यांच्यासह पथक घटनास्थळी पोहोचले. रात्री उशिरापर्यंत पंचनामा सुरू होता. मृत महिलेबाबत माहिती काढण्याची प्रक्रिया पोलिस करीत आहेत. तिच्या हातावर सिद्धार्थ असे गोंदविण्यात आले असून, पतीचा शोध सुरू होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर