शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाचा तडाखा, वीज पडून दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:17 IST

नरखेड/उमरेड/कळमेश्वर : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागाला सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाचा तडाखा बसला. नरखेड तालुक्यातील सिंजर आणि कुही तालुक्यातील ...

नरखेड/उमरेड/कळमेश्वर : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागाला सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाचा तडाखा बसला. नरखेड तालुक्यातील सिंजर आणि कुही तालुक्यातील पचखेडी येथे गारपीट झाली. येथे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यासोबतच भिवापूर तालुक्यातील पेंढराबोडी आणि कळमेश्वर तालुक्यातील ब्राह्मणी येथे वीज पडून दोघांचा मृत्यू झाला. सचिन रामाजी सहारे (३५) रा.पेंढराबोडी, अमोल नारायण काखे (२५) रा.ब्राह्मणी अशी मृतांची नावे आहेत.

जिल्ह्यात नरखेड, कुही, रामटेक आणि भिवापूर तालुक्यातील काही भागात दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. नरखेड तालुक्यातील सिंजर येथे दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपीट झाली. त्यामुळे शिवारातील हरभरा,गहू, कापूस, संत्रा, मोसंबीचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे.

कळमेश्वर तालुक्यातील ब्राह्मणी येथे दुपारी २.३० वाजताच्या सुमारास वीज कोसळून अमोल काखे याचा मजुराचा मृत्यू झाला. तो स्थानिक रहिवासी नामदेव क्षीरसागर यांचे गुरे चराईचे काम करीत होता. गुरुवारी नेहमीप्रमाणे तो ब्राह्मणी येथील रिजेंट शाळेच्या समोरील परिसरात गुरे चारत असताना कडाक्याच्या विजांसह पावसाला सुरुवात झाली. अमोल आडोसा घेण्याकरिता नजीकच्या निंबाच्या झाडाखाली उभा झाला असता त्याच्या अंगावर वीज कोसळली. त्याचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच कळमेश्वर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे पाठविण्यात आला.

भिवापूर तालुक्यात पेंढराबोडी येथे दुपारी २ वाजताच्या सुमारास शेतात हरभरा कापणी सुरु असताना सचिन रामाजी सहारे या शेतकऱ्याचा वीज कोसळून मृत्यू झाला. यामध्ये त्याचा लहान भाऊ अरविंद सहारे हा थोडक्यात बचावला. पांढराबोडी येथील सचिन सहारे याच्याकडे अडीच एकर शेती आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी थोड्याफार हरभऱ्याची कापणी केली होती. अशातच आज उर्वरित कापणी आणि वेचणी यासाठी सचिन त्याचा भाऊ अरविंद, वडील रामाजी, आई नत्थाबाई शेतमजुरांसमवेत शेतात होते. अशातच विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. ढीग लावलेल्या हरभऱ्याला पावसापासून बचाव करण्यासाठी सचिन आणि अरविंद दोघेही ताडपत्री घेऊन धावले. अशातच वीज कोसळली. यात सचिनचा जागीच मृत्यू झाला.