अपघातात दोन ठार

By Admin | Updated: October 9, 2015 02:59 IST2015-10-09T02:59:52+5:302015-10-09T02:59:52+5:30

बुधवारी हुडकेश्वर तसेच वाडीत झालेल्या अपघातात दोघांचा करुण अंत झाला. तर, एक जखमी आहे. त्याचप्रमाणे गुरुवारी वर्धा मार्गावर झालेल्या अपघातात एका महिलेसह तिघे जबर जखमी झाले.

Two killed in accident | अपघातात दोन ठार

अपघातात दोन ठार

तिघे गंभीर : वाहतुकीतही व्यत्यय
नागपूर : बुधवारी हुडकेश्वर तसेच वाडीत झालेल्या अपघातात दोघांचा करुण अंत झाला. तर, एक जखमी आहे. त्याचप्रमाणे गुरुवारी वर्धा मार्गावर झालेल्या अपघातात एका महिलेसह तिघे जबर जखमी झाले. या अपघाताने वर्धा मार्गावरची वाहतूक काही वेळेसाठी ठप्प झाली होती.
चंद्रकात शेषराव नागपुरे (वय ३६) आणि सुशील रूपराव नागपुरे (वय २८, दोन्ही रा. तेल्हारा,खापरी) हे दोघे बुधवारी दुपारी १२.३० च्या सुमारास मोटारसायकलने जात होते. हिंदुस्थान धाब्याजवळ ( आऊटर रिंग रोड) भरधाव ट्रक (एमएच ४०/ ६९५९) च्या आरोपी चालकाने मोटरसायकलला जोरदार धडक मारली. त्यामुळे दोघेही खाली पडून गंभीर जखमी झाले. त्यांना मेडिकलला नेले असता डॉक्टरांनी सुशीलला मृत घोषित केले. नागपुरेच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी आरोपी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला.
दुसरा अपघात अमरावती मार्गावर मंगळवारी रात्री ८.१० ला घडला. साहेबराव बाजीराव फुटाणे (वय ७०) यांना होंडा अ‍ॅक्टीव्हा (एमएच ३१/ ईएल ५५८६) च्या चालकाने धडक दिली. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या फुटाणे यांचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. हरीश गुणवंतराव फुटाणे (वय ४२, रा. महालक्ष्मीनगर, खडगाव रोड) यांच्या तक्रारीवरून वाडी पोलिसांनी आरोपी अ‍ॅक्टीव्हाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.सोमलवाड्यात गुरुवारी दुपारी २.१५ च्या सुमारास आरोपी ट्रेलर (सीजी ०४/ जेए ४९०९) चालकाने समोरून येणाऱ्या ट्रेलरला धडक दिली. त्यामुळे आरोपी चालक श्रावणसिंग हरीगेनसिंग हा जबर जखमी झाला. या अपघातात स्कुटीचालक रोहिणी राजेश देशमुख तसेच मोटारसायकलचालक शैलेष बाबुराव साखरकर (वय ४२, जाटतरोडी, इंदीरा नगर) हेसुद्धा गंभीर जखमी झाले. त्यांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. या अपघातामुळे वर्धा मार्गावरची वाहतूक काही वेळेसाठी ठप्प झाली. सोनेगाव पोलिसांनी आरोपी ट्रेलरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.(प्रतिनिधी)

Web Title: Two killed in accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.