Two flights from Nagpur to Ahmedabad | अहमदाबादसाठी नागपुरातून दोन उड्डाणे
अहमदाबादसाठी नागपुरातून दोन उड्डाणे

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गो एअर एअरलाईन्सची नागपुरातून अहमदाबादकरिता दोन उड्डाणे १ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. यामध्ये जी-८ ७३० नागपूर-अहमदाबाद विमान रविवार वगळता आठवड्यात सहा दिवस सकाळी ८.२० वाजता रवाना होईल तर अहमदाबादहून नागपूरकडे सकाळी १०.२० वाजता परत येईल. दुसरे विमान जी-८ ७३२ नागपूर-अहमदाबाद सायंकाळी ४.४५ वाजता रवाना होईल तर जी-८ ७३३ अहमदाबाद-नागपूर सायंकाळी ६.५० वाजता परत येईल. या उड्डाणांसाठी १८० सीटांच्या एअरबस ३२० चा उपयोग करण्यात येणार आहे.


Web Title: Two flights from Nagpur to Ahmedabad
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.