शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

मेडिकलमध्ये पकडले दोन तडीपार गुंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 11:30 PM

तडीपार केलेल्या दोन गुंडांना मेडिकलच्या सुरक्षा रक्षकांनी मोठ्या शिताफीने पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. रविवारी रात्री घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली. पोलिसांनी सुरक्षा रक्षकाच्या कार्याचे कौतुकही केले.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : तडीपार केलेल्या दोन गुंडांना मेडिकलच्या सुरक्षा रक्षकांनी मोठ्या शिताफीने पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. रविवारी रात्री घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली. पोलिसांनी सुरक्षा रक्षकाच्या कार्याचे कौतुकही केले.मेडिकल रुग्णालयाच्या वॉर्ड क्र. ४२ च्या परिसरात दोन अज्ञात तरुण रविवार २८ जुलैच्या रात्री १२ वाजेदरम्यान बसून होते. याचवेळी महाराष्ट्र सुरक्षा बल (एमएसएफ) चे सुरक्षा पर्यवेक्षक जयराम बिनझाडे हे सहकारी निखिल तामनीक, इमरान शहा जुम्मा व शुभम ठोंबरे यांच्यासह गस्त घालत होते. सुरक्षारक्षकांना दोघांवरही संशय आला. पण, सुरक्षारक्षकांना पाहताच दोघेही पळाले. सुरक्षारक्षकांनी दोघांचाही पाठलाग करून पकडले. विचारपूस करता-करता सुरक्षारक्षकांनी दोघांनाही मेडिकल परिसरातील पोलीस चौकीत आणले. दोघांविषयी अधिक माहिती काढली असता त्यांनी अंकित उमाशंकर उसावरसे रा. खरबी व राजा अन्सारी उर्फ फिरोज अन्सारी रा. कामठी अशी नावे सांगितली. दोघांवरही घरफोडी, लुटमार, चोरी आदींसारखे ७० ते ७५ गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे नागपूर पोलिसांनी दोघांनाही तडीपार केले आहे. मात्र, तरीसुद्धा ते नागपुरात आले आणि मेडिकल रुग्णालयात ते मध्यरात्री शिरले. काही अनुचित प्रकार घडण्यापूर्वीच कर्तव्यदक्ष सुरक्षारक्षकांना ते दिसले आणि दोघांनाही पकडले.

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयArrestअटक