शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

पहिल्या शंभरात नागपूरच्या दोन शिक्षण संस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 23:49 IST

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट रॅकिंग फ्रेमवर्क’ अंतर्गत देशभरातील विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांचे ‘रँकिंग’ जाहीर करण्यात आले. यात यंदा नागपुरातील शैक्षणिक संस्था माघारल्याचे दिसून आले. ‘व्हीएनआयटी’ (विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) सोडले तर नागपुरातील एकाही संस्थेला पहिल्या ३५ मध्ये ‘रँकिंग’ मिळालेले नाही. ‘व्हीएनआयटी’चा देशात ३१ वा क्रमांक आहे. मागील वर्षी ‘व्हीएनआयटी’ ४२ व्या स्थानावर होते. ‘टॉप’ १०० विद्यापीठांमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा कुठेही समावेश नसला तरी विद्यापीठाला प्रथमच पहिल्या दोनशे विद्यापीठांमध्ये ‘रॅकिंग’ मिळाले आहे. विद्यापीठ देशपातळीवर १९६ व्या स्थानावर आहे.

ठळक मुद्देराष्ट्रीय ‘रँकिंग’मध्ये ‘व्हीएनआयटी’ देशात ३१ व्या स्थानावर : नागपूर विद्यापीठ १९६ व्या स्थानी

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट रॅकिंग फ्रेमवर्क’ अंतर्गत देशभरातील विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांचे ‘रँकिंग’ जाहीर करण्यात आले. यात यंदा नागपुरातील शैक्षणिक संस्था माघारल्याचे दिसून आले. ‘व्हीएनआयटी’ (विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) सोडले तर नागपुरातील एकाही संस्थेला पहिल्या ३५ मध्ये ‘रँकिंग’ मिळालेले नाही. ‘व्हीएनआयटी’चा देशात ३१ वा क्रमांक आहे. मागील वर्षी ‘व्हीएनआयटी’ ४२ व्या स्थानावर होते. ‘टॉप’ १०० विद्यापीठांमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा कुठेही समावेश नसला तरी विद्यापीठाला प्रथमच पहिल्या दोनशे विद्यापीठांमध्ये ‘रॅकिंग’ मिळाले आहे. विद्यापीठ देशपातळीवर १९६ व्या स्थानावर आहे.देशातील विद्यापीठांचे तसेच विविध शैक्षणिक संस्थाचे ‘रँकिंग’ ठरविण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने प्रस्ताव मागविले होते. देशभरातील विविध विद्यापीठे व महाविद्यालयांनी हे प्रस्ताव जानेवारी महिन्यात सादर केले होते. नागपूर विद्यापीठ तसेच जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांचादेखील यात समावेश होता.सोमवारी जाहीर झालेल्या यादीत नागपुरातील सर्वच संस्था राष्ट्रीय पातळीवर माघारल्याचे दिसून आले. ‘व्हीएनआयटी’चा देशातील सर्वोत्तम अभियांत्रिकी संस्थांमध्ये ३१ वा क्रमांक आहे. इतर एकाही अभियांत्रिकी महाविद्यालयाला पहिल्या १०० मध्ये स्थान मिळविता आलेले नाही. मागील वर्षी अभियांत्रिकी संस्थांच्याच यादीमध्ये ‘आरकेएनईसी’ (रामदेवबाबा कमला नेहरु इंजिनिअरिंग कॉलेज) व जी.एच.रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय यांचा क्रमांक अनुक्रमे ६४ व ६७ वा होता. यंदा हा क्रमांक १३४ व १०९ इतका आहे. यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालय १५० व्या स्थानावर आहे. मध्य भारतातील शैक्षणिक हब म्हणून नागपूर शहर उदयाला येत आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय व फार्मसीमधील शैक्षणिक संस्थांची संख्या वाढली असली तरी दर्जा मात्र अद्याप हवा तसा सुधारलेला नाही, हेच या ‘रँकिंग’मधून स्पष्ट होत आहे.‘फार्मसी’त पहिल्या शंभरात ३ संस्थादेशातील ‘टॉप’ फार्मसी महाविद्यालयांमध्ये नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील ‘श्रीमती किशोरीताई भोयर कॉलेज आॅफ फार्मसी’ ला ४४ वे ‘रँकिंग’ मिळाले आहे. नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर फार्मसी विभागाला ७४ वे ‘रॅकिंग’ मिळाले असून गुरुनानक कॉलेज आॅफ फार्मसी ८१ व्या स्थानी आहे.नागपूर विद्यापीठ शंभरात नाही‘नॅक’चा ‘अ’ दर्जा मिळविणाऱ्या नागपूर विद्यापीठाला मात्र पहिल्या शंभरात ‘रॅकिंग’ मिळविण्यात यश आलेले नाही. देशपातळीवर विद्यापीठ १९६ व्या स्थानावर आहे. राज्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, इन्स्टिट्यूट आॅफ केमिकल टेक्नॉलॉजी, होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट, टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्स, सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, डी. वाय.पाटील विद्यापीठ, एसव्हीकेएम नरसी मोन्जी इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेन्ट स्टडीज्, भारती विद्यापीठ, डी.वाय.पाटील एज्युकेशन सोसायटी, यांना या यादीत पहिल्या शंभरात स्थान मिळाले आहे.शहरातील संस्थांचे ‘रँकिंग’विद्यापीठ गट                                                   विद्यापीठ रॅकिंगराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ             १९६अभियांत्रिकी गट                                             संस्था रँकिंगव्हीएनआयटी                                                           ३१जी.एच.रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय             १०९रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालय                     १३४नागपूर विद्यापीठ                                                       १४३यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालय          १५०फार्मसी गट                                                       संस्था रँकिंग‘श्रीमती किशोरीताई भोयर कॉलेज आॅफ फार्मसी’      ४४पदव्युत्तर फार्मसी विभाग, नागपूर विद्यापीठ             ७४गुरुनानक कॉलेज आॅफ फार्मसी                                ८१व्यवस्थापन गट                                           संस्था रॅकिंगइन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेन्ट टेक्नॉलॉजी            ५६

टॅग्स :educationशैक्षणिकnagpurनागपूर