शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

छिंदवाड्यातील मजुरांची झाली दोन दिवस उपासमार : पायीच निघाले गावाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 00:33 IST

छिंदवाड्यातील पाच मजूर आठ दिवसांपूर्वी हुडकेश्वर परिसरात सेंट्रिंगच्या कामासाठी आले. परंतु शहरात कर्फ्यू लागल्यामुळे काम बंद झाले. जवळचे रेशन संपले. कालपासून हे मजूर उपाशी होते. जवळचे पैसेही संपले. अखेर पायीच हे मजूर उपाशीपोटी गावाकडे निघाले.

ठळक मुद्देस्वयंसेवी संस्थेने केली भोजनाची सोय

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : छिंदवाड्यातील पाच मजूर आठ दिवसांपूर्वी हुडकेश्वर परिसरात सेंट्रिंगच्या कामासाठी आले. परंतु शहरात कर्फ्यू लागल्यामुळे काम बंद झाले. जवळचे रेशन संपले. कालपासून हे मजूर उपाशी होते. जवळचे पैसेही संपले. अखेर पायीच हे मजूर उपाशीपोटी गावाकडे निघाले होते. शहरातील सुभाष मार्गावर कळमना परिसरातील युवकांनी त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली.हुडकेश्वर परिसरात सोनपूर, ता. अंबडवाडा, जि. छिंदवाडा येथील जगपाल एहके, संतलाल इवनाते, रामभान इवनाते, रामकुमार इवनाते, दीनदयाल सरयाम हे मजूर १९ मार्चला सेंट्रिंगच्या कामासाठी आले होते. दोन दिवसात कंत्राटदाराने काम बंद केले. परंतु सोबत असलेले तांदूळ, गव्हाचे पीठ या साहित्याच्या आधारावर या मजुरांनी दोन दिवस काम सुरू होण्याची वाट बघितली. परंतु काम सुरू झालेच नाही. अशातच बुधवारी त्यांच्याकडील रेशनही संपले. त्यामुळे रात्रभर ते उपाशी होते. बस आणि रेल्वे वाहतूक बंद असल्यामुळे गावाकडे कसे जायचे, असा प्र्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला. अखेर पायीच गावाकडे जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांच्या जवळील पैसेही संपले होते. परंतु नागपुरात उपाशीपोटी मरण्यापेक्षा गावाकडे पायी जाऊ, असे त्यांनी ठरविले अन् ते पायीच निघाले. यावेळी कळमना मार्केट परिसरातील अंकित साकोरे, अभिषेक बावनकुळे, मुकेश निखारे, बाल्या बागडे हे खिचडी, चहा ऑटोमध्ये घेऊन वितरण करीत होते. रस्त्याने हे मजूर जाताना दिसताच त्यांनी ऑटो थांबवून या मजुरांना खिचडी, पाणी दिले. शहरातील मंदिर, रस्त्यावरील भुकेल्या नागरिकांना बुधवारपासून भोजन वितरित करीत असल्याचे या युवकांनी सांगितले. रस्त्यावरच या युवकांनी दिलेले अन्न खाल्ल्यानंतर हे मजूर छिंदवाडाच्या दिशेने निघून गेले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याLabourकामगार