लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी दुपारी २ च्या सुमारास माओवाद्यांनी टर्मिनल बिल्डिंगमध्ये दोन बॉम्ब ठेवल्याची सूचना मिळाली. थोड्याच वेळात बॉम्बचा शोध घेऊन ते निकामी करण्यात आले. यादरम्यान विमानतळाच्या आतील सर्व कर्मचारी व प्रवाशांना टर्मिनल बिल्डिंगपासून दूर ठेवण्यात आले होते.मंगळवारी दुपारी २ वाजेपर्यंत विमानतळावर नेहमीप्रमाणे सामान्य परिस्थिती होती. दुपारी २.२० च्या सुमारास एअर एशियाच्या बुकिंग आॅफिस व एअरपोर्ट अॅथॉरिटी आॅफ इंडिया(एएआय)ला एक फोन कॉल आला. यात सांगण्यात आले की, काही व्हीव्हीआयपींना उडविण्यासाठी माओवाद्यांनी विमानतळावर दोन बॉम्ब पुरलेले आहेत. परंतु व्हीव्हीआयपींनी विमान प्रवास रद्द केल्याबाबतचा पुन्हा कॉल आला व पुरण्यात आलेल्या दोन्ही बॉम्बचा एक तासाचा स्फोट होणार असल्याची माहिती देण्यात आली. यानंतर संबंधित सुरक्षा यंत्रणेला याची माहिती देण्यात आली.केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला(सीआयएसएफ)च्या सशस्त्र जवानांनी मोर्चा सांभाळला. या सुरक्षा यंत्रणेचे श्वान पथकही पोहोचले. विमानतळाच्या आतील अनेक लोकांना नेमके काय सुरू आहे, याची माहिती नव्हती. यादरम्यान मिहान इंडिया लिमिटेड (एमआयएल) च्या अग्निशमन दलाचे कर्मचारी डिपार्चर गेटवर सज्ज झाले. २.३० ला पोलीस बॉम्ब शोधक पथक पोलिसांच्या मदतीला दाखल झाले. काही वेळातच महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या गाड्याही आल्या.यादरम्यान सुरक्षा रक्षकांनी शिटी वाजवून ड्रॉप अॅन्ड गो झोनपासून दूर राहण्याचे लोकांना तसेच वाहनांना दूर ठेवण्याचे सांगण्यात आले. एमआयएल, एएआय व एअरलाईन्सचे कर्मचारी प्रसंगावधान ओळखून सतर्क झाले अन् सुरक्षा जवानांसोबत कामाला लागले.
नागपूर विमानतळावर आढळले दोन बॉम्ब! मॉक ड्रील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 00:26 IST
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी दुपारी २ च्या सुमारास माओवाद्यांनी टर्मिनल बिल्डिंगमध्ये दोन बॉम्ब ठेवल्याची सूचना मिळाली. थोड्याच वेळात बॉम्बचा शोध घेऊन ते निकामी करण्यात आले. यादरम्यान विमानतळाच्या आतील सर्व कर्मचारी व प्रवाशांना टर्मिनल बिल्डिंगपासून दूर ठेवण्यात आले होते. सतर्कतेबाबतच्या सरावासाठी ही नियमित स्वरूपाची मॉक ड्रील होती.
नागपूर विमानतळावर आढळले दोन बॉम्ब! मॉक ड्रील
ठळक मुद्देएक तासाचा अल्टिमेटम; संपूर्ण विमानतळ खाली करण्यात आले