शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

नागपुरातील अडीच हजार पाकिस्तानी, बांगलादेशींच्या नागरिकत्वाचा मार्ग मोकळा; अनेक वर्षांपासून प्रयत्न 

By नरेश डोंगरे | Published: March 15, 2024 7:58 PM

प्रदीर्घ काळापासून ही मंडळी भारताचे नागरिकत्व मिळण्याच्या प्रतिक्षेत आहे.

नागपूर: अनेक वर्षांपासून भारताचे नागरिकत्व मिळावे म्हणून प्रयत्न करणाऱ्या, नागपुरात वास्तव्याला असलेल्या पाकिस्तानमधील दोन हजारांवर शरणार्थींसह बांगलादेशी आणि अफगाणी नागरिकांनाही अखेर भारतीय नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रदीर्घ काळापासून ही मंडळी भारताचे नागरिकत्व मिळण्याच्या प्रतिक्षेत आहे.

भारत आणि पाकिस्तान दरम्यानचे संबंध अधिक चांगले व्हावे, या उद्देशाने २२ जुलै १९७६ ला समझोता एक्स्प्रेस नामक ट्रेन सुरू करण्यात आली होती. मात्र १८ फेब्रुवारी २००७ ला समझोता एक्स्प्रेस हरियाणातून धावत असताना पानिपतजवळ या गाडीत भयानक बॉम्बस्फोट झाले. त्यात ६८ प्रवाशांचे जीव गेले आणि कित्येकांना कायमचे अपंगत्वही आले. त्यानंतर या ट्रेनमधील नागरिकांच्या आवागमनावर वाद होऊ लागला. या पार्श्वभूमीवर अखेर ८ ऑगस्ट २०१९ पासून समझोता एक्स्प्रेसचे संचालन बंद करण्यात आले.

या गाडीने भारतात आपल्या नातेवाइकांकडे येणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची संख्या मोठी होती. येथे येण्यासाठी कुणी नातेवाइकांकडील कार्यक्रम, कुणी पर्यटन तर कुणी उपचाराचे निमित्त सांगून तसा दीर्घ मुदतीचा व्हिजा (एलटीव्ही) मिळवला होता. येथे थांबल्यानंतर काहींना येथेच रोजगार मिळाल्याने त्यांनी आपल्या व्हिजामध्ये वेळोवेळी वास्तव्यासाठी मुदतवाढ करून घेतली. यातील अडीच हजारांवर नागरिक असे आहेत की त्यांची मुले येथेच शिकून लहानांची मोठीही झाली. मात्र, त्यांच्याकडे अधिकृत भारतीय नागरिकत्व नाही. गेल्या १० ते १५ वर्षांपासून ते नागपुरात वास्तव्याला असल्यामुळे ते अधिकृतरीत्या पोलिस रेकॉर्डवरही आहे. त्यामुळे या सर्वांना आता भारताचे नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सहा वर्षांची अट११ मार्च २०२४ ला केंद्र सरकारने लागू केलेल्या भारतीय नागरिकत्व (सुधारणा) कायद्यात पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तीन देशांमधील अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद आहे. अर्थात भारताचे नागरिकत्व मिळवण्यासाठी त्या व्यक्तीचे भारतात किमान सहा वर्षे वास्तव्य अपेक्षित आहे. प्रारंभी वास्तव्याची अट ११ वर्षांची होती. ती या कायद्यामुळे शिथिल होऊन सहा वर्षांवर आली आहे. सर्वाधिक पाकिस्तानी, अफगाणी फक्त तीनसंबंधित अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, नागपुरात अनेक वर्षांपासून वास्तव्याला असलेल्या विदेशी नागरिकांमध्ये सर्वाधिक संख्येत पाकिस्तानी आहेत. त्यांची संख्या २१०० ते २२०० दरम्यान आहे. बांगलादेशी नागरिकांची संख्या १५० वर आहे. तर, अफगाणी मात्र केवळ ३ आहेत. हे सर्व आता सरकारच्या वेबपोर्टलवर जाऊन नागरिकत्व मिळण्यासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.

टॅग्स :nagpurनागपूरcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक