बाधितांपेक्षा सव्वादोन पट अधिक रुग्ण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:08 IST2021-05-13T04:08:28+5:302021-05-13T04:08:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मागील महिन्यात कोरोनाची दाहकता झेलणाऱ्या नागपूर जिल्ह्याला दिलासा मिळतो आहे. बुधवारी नव्या बाधितांपेक्षा सव्वादोन ...

बाधितांपेक्षा सव्वादोन पट अधिक रुग्ण कोरोनामुक्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील महिन्यात कोरोनाची दाहकता झेलणाऱ्या नागपूर जिल्ह्याला दिलासा मिळतो आहे. बुधवारी नव्या बाधितांपेक्षा सव्वादोन पट कोरोनामुक्त झाले. परंतु जिल्ह्यातील मृत्यू पडणाऱ्यांची संख्या अद्यापही ६५ च्या वर असल्याने चिंता कायम आहे.
बुधवारी नागपूर जिल्ह्यात २ हजार ५३२ रुग्ण आढळले. यातील १ हजार ३१९ रुग्ण नागपूर शहरातील तर १ हजार २०० रुग्ण ग्रामीण भागातील होते. या तुलनेत ठीक होणाऱ्यांची संख्या बरीच जास्त होती. २४ तासात ५ हजार ७०८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. यातील
२ हजार ६४१ रुग्ण शहरातील तर, ३ हजार ६७ रुग्ण ग्रामीण भागातील होते.
जिल्ह्यात ६७ मृत्यूची नोंद झाली. यात शहरातील ३५, ग्रामीणमधील १९ तर जिल्ह्याबाहेरील १३ जणांचा समावेश होता.
भरती रुग्णांची संख्या १० हजाराखाली
जिल्ह्यात एकूण ४३ हजार ३५३ सक्रिय रुग्ण आहेत. यातील २२ हजार ११० रुग्ण शहरातील तर, २१ हजार २४३ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. सक्रिय रुग्णांपैकी ३४ हजार ६६ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत, तर विविध रुग्णालयांमध्ये ९ हजार २८७ रुग्ण दाखल आहेत.
ग्रामीणमध्ये चिंता कायम
२४ तासात जिल्ह्यात १७ हजार १६१ चाचण्या झाल्या. यात ग्रामीण भागातील १२ हजार ४१० तर ,शहरातील ४ हजार ७५१ चाचण्यांचा समावेश होता. ग्रामीणमध्ये चाचण्यांच्या तुलनेत पॉझिटिव्ह रुग्णांची टक्केवारी शहरापेक्षा अधिक होती.
मागील सात दिवसातील आकडेवारी
दिनांक – नवे बाधित – बरे झालेले – मृत्यू
६ मे – ४,९०० – ६,३३८ – ८१
७ मे – ४,३०६ – ६,५२६ – ७९
८ मे – ३,८२७ – ७,७९९ – ८१
९ मे – ३,१०४ – ६,५४४ – ७३
१० मे – २,५३० – ६,०६८ – ५१
११ मे – २,२४३ – ६,७२५ - ६५
१२ मे – २,५३२ – ५,७०८ – ६७